पुणे : प्रतिष्ठीत बेव्हर्ली हिल्स बुक ऍवॉर्ड पुरस्कार प्राप्त लेखक श्री. नीरज श्रीवास्तव ह्यांचे “डॅगर्स ऑफ ट्रीसन – दि कर्स ऑफ दि मुघल्स सिरीज”चा पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यात पार पडला.
काही उत्कृष्ट मुघलांचे बरेच रोचक किस्से ह्यात असल्याचे लेखक श्री. नीरज श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितले.कार आणि पुस्तकांवर प्रचंड प्रेम असलेले, अनोख्या पुस्तकांचा १५००० वर संग्रह असणारे श्री. नीरज श्रीवास्तव हे ३ पिढ्या डॉक्टर असणाऱ्या कुटुंबातून येतात.
श्री. नीरज श्रीवास्तव हे दिवाण राय गुरुबक्ष सिंग यांचे थेट वंशज तर बनारसचे महाराजा चेत सिंग यांचे फार पूर्वीचे वंशज आहेत. ह्याबद्दल बोलताना ते राजघराणांच्या राजेशाही आणि औपचारिकतेवरही दिलखुलास बोलले.
पराक्रमी मुघलांच्या भव्यता आणि राहस्यांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. सुमारे ९०००० हून जास्त शब्द असलेल्या ह्या काल्पनिक पुस्तकात अकबराच्या काळचे कित्येक रहस्य आणि सत्य प्रकाशझोतात आले आहे. त्याचबरोबर अनारकलीच्या प्रदीर्घ गुढ्, शाही न्यायालयाचा विश्वासघाती कार्यकारीणीचाही ह्यात उल्लेख आहे.
४ अंक असलेल्या ह्या साखळीचे हे पहिले पुस्तक आहे आणि श्री. नीरज श्रीवास्तव यांचा हॉलीवूडशी करार देखील झाला आहे. हॉलीवूड कंपनी सुएरटे होल्डिंग्स, लोस अन्जेलीस असे ह्या कंपनीचे नाव आहे. हे पुस्तक लवकरच मालिकेच्या स्वरुपात जगासमोर येणार आहे..
कँटेबरी युनिव्हर्सिटी, युके येथून श्री. नीरज श्रीवास्तव यांनी पी एच डी प्राप्त केली आहे. नीरजजी हे फार पूर्वीपासून लिखाण करताहेत आणि ह्याकरता त्यांनी देशातील आणि देशाबाहेरील बरेच पुरस्कार मिळाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथे या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. www.bookthela.com या संकेतस्थळावर हे पुस्तक उपलब्ध आहे.