४ जून ते ९ जूनला निशुल्क शिबीराचे आयोजन
पुणे- जगातील जवळजवळ ३६० दशलक्ष लोक म्हणजे जगाच्या लोकसंख्येचे ५% लोक हे न ऐकू येण्याच्या समस्येने त्रस्त आहे. ह्यातील ९% म्हणजे ३२ दशलक्ष १५ वर्षाखालील मुले आहेत. १००० मधील ५ मुले अत्यंत कमी वयातच ह्या समस्येला बळी पडतात. ऐकू न येण्यामुळे बालक बोलुदेखील शकत नाही हे सिद्ध झाले आहे. ह्या सगळ्याचा वाईट परिणाम मुलांच्या भविष्यावर झालेला दिसून येतो.
२ वर्षाखालील ३ मुलांवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने यशस्वीरीत्या कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांचे बालपण परत मिळवून दिले आहे. ४ जून ते ९ जून ह्या काळात निशुल्क शिबिराचे आयोजन केले आहे. कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांच्या पालकांकरिता ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येते. ह्यात सर्जरी, ऑडियोलॉजी आणि हॅबिलीटेशनमधील तज्ञ मंडळींना भेटण्याची संधी मिळते. ह्यात त्यांना सर्व प्रकारचे योग्य ते मार्गदर्शन मिळते. लवकर कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्याने मुलांच्या बोलण्यावर, अभ्यासावर कसा फायदा होतो, कुठले कॉकलीयर इम्प्लांट निवडावे ह्याचसोबत सर्वात प्रगत कॉकलीयर इम्प्लांटदेखील दाखविण्यात येते.
२०१७ साली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा कॉकलीयर इम्प्लांट प्रोग्राम सुरु झाला. कॉकलीयर इम्प्लांटचा प्रसार करून गरजूंपर्यंत त्याची माहिती जावी आणि ह्याने समाजाला फायदा होऊन त्याच्या उपयोगाने एक सक्षम नागरिक बनावा असे उद्दिष्ट ह्या प्रोग्राममागे होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्जन्स डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. विक्रम ओक, डॉ. नीलांजन भौमिक, ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार, हॅबिलीटेशनिस्ट वृषाली देसाई, गोविंद राजोपाध्ये आणि कॉकलीयर इम्प्लांट कोऑर्डीनेटर रेवा इंदुरकर अशा तज्ञ मंडळींची टीम कॉकलीयर इम्प्लांटसवर काम करते.
“भारतात युनिवर्सल न्यू बॉर्न स्क्रीनिंगची अत्यंत आवश्यकता असून त्याने बालकांच्या जन्माच्या वेळीच ऐकण्याचे निदान केले जाईल. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे कॉकलीयर इम्प्लांट जन्माला आले ज्याच्या मदतीने बहिरेपणा समूळ नष्ट होऊन तुम्हाला एक नवीन आयुष्य प्राप्त होते”, असे विचार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कॉकलीयर इम्प्लांट सर्जन्स डॉ. विक्रम ओक आणि डॉ. नीलांजन भौमिक यांनी मांडले.
“अल्पवयात बहिरेपणाचे निदान झाल्याने कॉकलीयर इम्प्लांटसच्या माध्यमातून ते लगेच बरे करण्यात येते. ह्यामुळे मुलांची भाषा चांगली होण्यास मदत होते व एक सामान्य माणूस म्हणून ते आयुष्य जगू शकतात” असे मत ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार ह्यांनी मांडले.