पुणे- आज त्यांचा ९२ वा वाढदिवस होता, पण ते गेल्या १७ तारखेपासून सातारा रस्त्यावरील पुष्प मंगल कार्यालयात च रोज ५ हजार लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत दंग आहेत . अर्थात त्या उद्योजक माणिकचंद दुगड यांच्या सोबत त्यांचा पूर्ण परिवार हि त्यांचा हा ध्यास सोबत घेऊनच इथे वावरतो आहे. कोरोनाच्या थैमाना ला पायबंद घालताना असंख्य सेवेकरी पुण्यात दिसून येतात . दुगड परिवार हे त्यातल एक वरचं नाव मानांव लागेल. पुष्प मंगल कार्यालयात जेवण बनवून त्याची पाकिटे बनविणे आणि ती वेगवेगळ्या भागात आवश्यक्यता आहे तिथे पाठविणे असे काम हा परिवार आपल्या स्नेही सोबतींना बरोबर घेऊन करतो आहे . प्रत्यक्ष तिथे जाऊन आमचे प्रतिनिधी मयूर आणि अभिषेक लोणकर यांनी बनविलेला हा एक व्हिडीओ रिपोर्ट
वयाच्या ९२व्या वर्षीही सेवेचाच ध्यास -माणिकचंद दुगड परिवाराकडून रोज ५ हजार जेवणाची पाकिटे (व्हिडीओ)
Date:

