नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनेक बडे नेते सोडून गेल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी पक्षाला अलविदा केलं आहे.
मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. परंतू पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांपेक्षा या नगरसेवकांनी मात्र वेगळं कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
राज्यसभेत नुकतेच ‘तीन तलाक’ विधेयक मंजूर झालं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी राज्यसभेत त्या विधेयकाला विरोधही केला नाही, असं कारण देत या नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.
राष्ट्रवादीचा राजीनामा जरी दिलेला असला तरी त्यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे आणखी सांगितलेलं नाहीये.

