योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : कायरा रैना, स्मित थोकल, ख्याती कत्रे यांनी हवेली तालुका संघटनेच्या वतीने आयोजित योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्धीवर मात करून आगेकूच केली.
पीवायसी येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या दुसऱ्या फेरीत स्मितने त्रिनवा भरवर २१-७, २२-२० अशी मात केली. यानंतर जतीन सराफने अश्विन मित्तलला २१-४, २१-८ असे नमविले. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत ख्याती कत्रेने शर्वरी घाडगेला २१-४, २१-५ असे, तर शिप्रा कदमने अद्विका पवारला १५-२१, २१-१०, २१-१६ असे नमविले. कायरा रैनाने स्वरा मोरेला १२-२१, २१-१७, २१-१२ असे पराभूत करून आगेकूच केली.
निकाल : ११ वर्षांखालील मुले – अर्चित खान्देशे वि. वि. राघव तामसेकर २१-६, २१-५, गणेश कोसावी वि. वि. मल्हार तांबे २१-१०, २१-७, कार्तिक रोंगे वि. वि. आगम आचलिया २१-२३, २१-१८, २१-१९, अर्हम आचलिया वि. वि. जय शिंदे २१-१५, २१-३, ओजस जगताप वि. वि. विहान गंगाल २१-१३, २२-२०, कबीर देसाई वि. वि. साहिर तुरुंबेकर २१-१८, २१-१७, अद्वय केळकर वि. वि. ईशान बापट २२-२०, २१-१८, शौनक केळकर वि. वि. कियांश बभूजदी २१-६, २१-७.
११ वर्षांखालील मुली – आरोही मालवणकर वि. वि. तेजश्री शेंडे २५-२३, २१-१२, विहा गुरव वि. वि. आराध्या डोंगरे २१-१८, २१-१९, काश्वी सिंग वि. वि. अभिज्ञा पाटील २१-१५, २१-११, रुही शिंदे वि. वि. शायना बुदयाल २१-१०, २१-८ वनिशा राय वि. वि. मृन्मयी जोगळेकर २३-२१, २१-९, स्वरा कुलकर्णी वि. वि. स्वरा पांडे २१-१८, २१-१०.
१३ वर्षांखालील मुले – आनंद खर्चे वि. वि. सिद्धराज पवार २१-१०, २१-८, अद्विक काळे वि. वि. शौनक वेंकटेश २१-११, २१-१३, दिविक गर्ग वि. वि. वरद आठल्ये २१-११, २१-१६, प्रथमेश जगदाळे वि. वि. विहान गायकवाड २१-६, २१-४, शौर्य यादव वि. वि. अवयुक्त बेंगारी २१-१६, १७-२१, २१-१६, अभिनव भोंडवे वि. वि. वरद निपसे २१-४, २१-१२, ईशान रॉय वि. वि. अमन वर्मा २१-३, २१-१४.
१५ वर्षांखालील मुली – शुभदा जाधव वि. वि. दर्शना माळी २१-१६, २१-१६, स्वराली थोरवे वि. वि. अदिती गिरी २१-११, २३-२१, द्विती शहा वि. वि. दिविना राका २१-११, २१-१२, प्रणवी मोहळकर वि. वि. अवनी शहा २१-७, २१-१०, शौर्या रोळे वि. वि. श्रीजा नानजकर २१-८, २१-१०, सिद्धी जगदाळे वि. वि. धानी झलवाडिया २१-१६, २१-१९
१९ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – प्रयाण महाशब्दे वि. वि. दिव्यांश यारागट्टी २१-१४, २१-१०, आर्यन शेख वि. वि. चैतन्य प्रभू २१-१६, २१-१७, अगस्त्य कुंदन तितर वि. वि. अरहान शेख २१-१८, २१-७, शिवांश नादगोंडे वि. वि. रेयांश पानसरे २१-८, २१-११.