योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : अद्विक काळे, अमन वर्मा, सिद्धराज पवार, बुरहनुद्दीन अगाशिवाला आणि कबीर कुलकर्णी यांनी पीवायसी एचटीबीए-अमनोरा कप १५ व्या जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या गटात विजयी सलामी दिली.
पीवायसी येथील बॅडमिंटन कोर्टवर बुधवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन पीवायसीचे सारंग लागू आणि तन्मय आगाशे, कॉर्पोरेट अॅथलिट्सचे संस्थापक अभिजित चांदगुडे, रेफ्री सिद्धार्थ पळनिटकर यांच्या उपस्थितीत झाले. या वर्षीच्या स्पर्धेतील खेळाडूंनी १५ व्या वर्षीच्या अमनोरा कपच्या लोगोचे उद्घाटन केले. पहिल्यांदाच स्पर्धेतील खेळाडूंनी उद्घाटनाचा मान मिळवला आहे.
स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या सलामीच्या लढतीत अद्विक काळेने राऊ जाधव वर २१-१३, २१-१२ अशी, तर अमन वर्माने कार्तिक रोंगेवर २१-१३, २१-११ असा विजय मिळवला. यानंतर अव्युक्त बेंगेरीने शौर्य वर्माला २१-१७, २१-१० असे, तर वरद निपसेने आर्यन मेहताला २१-८, २१-४ असे नमविले. सिद्धराज पवारने आदित्य शिंदेवर २१-१५, २१-१३ अशी तर बुरहनुद्दीन अगाशिवालाने अद्विक वर्मावर २१-४, २१-१० अशी मात केली. कबीर कुलकर्णीने सोहम मांडेवर २२-२०, २१-१९ अशी मात केली.
निकाल – पहिली फेरी – १९ वर्षांखालील मुली – कैरा मदन वि. वि. रावी कदम १८-२१, २१-१५, २१-१७,
१९ वर्षांखालील मुले – प्रायन महाशब्दे वि. वि. ईशान जोशी २२-२४, २१-१३, २१-१९, अगस्थ्या कुंदन तितार वि. वि. हर्षित वाणी २१-१६, २१-६, रेयांश पानसरे वि. वि. पिनाक गोऱ्हे २१-१०, २१-१०.
१३ वर्षांखालील मुली – अन्वी कुलकर्णी वि. वि. आरोही शिंदे २१-४, २१-१२, हीदा केडिया वि. वि. प्रशांती नाळे २१-१८, २१-१८, राजलक्ष्मी परदेशी वि. वि. आराध्या कोयते २१-५, २१-८, निधी गायकवाड वि. वि. सृष्टी कुलकर्णी २१-७, २१-२, केयारा साखरे वि. वि. आराध्या डोंगरे २१-१३, २१-१४, अस्मी मेहेर वि. वि. काव्या बेजगमवार २१-१९, २१-१५, स्वरा जाधव वि. वि. मृणाली बडगुजर २१-७ २१-२३, २१-१४, आरोही देसाई वि. वि. युगंधरा कुंभार २१-५, २१-११.
१३ वर्षांखालील मुले – सिद्धान्त धमा वि. वि. वेदांत चौधरी २१-१९, २१-१४, दियान पारेख वि. वि. क्रिनाय शाह २१-६, २१-४.
१५ वर्षांखालील मुले – खुश दीक्षित वि. वि. स्निथिक दास २१-३, २१-८, सम्वित देशमुख वि. वि. नैतिक जोशी २१-१४, २१-९, आरव सिन्हा वि. वि. गौरव ठाकूरदास २१-१४, २१-१९, आरुष दुग्गल वि. वि. स्वराज सोनावणे २१-१५, २१-११, मिर शाहझर अली वि. वि. तनीश देवरे २१-११, २१-११, आर्यन नागवडे वि. वि. सर्वज्ञ माने २१-७, २१-८, स्मीत थोकल वि. वि. यश मोरे २७-२५, २१-१६, २१-१७, अर्णव पाटील वि. वि. अदित कानेटकर २१-११, २१-१७, स्वरीत पवार वि. वि. सुधान्व कुलकर्णी २१-१५, १७-२१, २१-१६, शरव जाधव वि. वि. दिवित मुथा २१-१३, २१-३, अक्षत नायक वि. वि. आर्यन पानसे २१-१६, २१-१८, वेदू रेड्डू मल्लू वि. वि. ओजस पाटकर २१-१६, २१-११७, आर्यन भोसले वि. वि. आदित्य सिंग २१-८, २१-१६.
११ वर्षांखालील मुले- ओजस जगताप वि. वि. चैतन्य प्रभू २१-७, २१-४ साहिर तुरांबेकर वि. वि. सोहम कुलकर्णी २१-१२, २१-५, ईशान बापट वि. वि. अव्यांश श्रीवास्तव २१-२, २१-६, अद्वय केळकर वि. वि. मीत झोलाने २१-८, २१-६, शौनक केळकर वि. वि. आर्यंश लोंढे २१-१०, १५-२१, २१-१५, अद्वैत भोंडवे वि. वि. किआन गाडगीळ २१-१६, २१-८, अनय पिसे वि. वि. रुचिर कुंटे २३-२१, २१-६.

