· BE 6 पॅक तीन: 26.9 लाख रु.; ईएमआय 39,224 रु. पासून (पॅक वनसारखाच)
· XEV 9e पॅक तीन: 30.5 लाख रु; ईएमआय 45,450 रु पासून (पॅक वनसारखाच)
· आपली पसंती 7 जानेवारी 2025 पासून नोंदवा
· चाचणी ड्राइव्ह 14 जानेवारी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार
· BE 6 आणि XEV 9e साठी नोंदणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच वेळी सुरू होणार
पुणे, 8 जानेवारी 2025: महिंद्राने आज आपल्या ‘अनलिमिट इंडिया टेक डे’ दरम्यान BE 6 आणि XEV 9e या प्रमुख इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीच्या टॉप-एंड (पॅक थ्री) व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या. ही घोषणा 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या ‘अनलिमिट इंडिया’ कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणाच्या आधारावर करण्यात आली. याच कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e सादर करण्यात आल्या होत्या.
महिंद्राचे प्रीमियम तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांसाठी सुलभ करण्याचे ध्येय पॅक थ्री द्वारे साकारले जाते. पॅक थ्री लक्झरी, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि अतुलनीय कामगिरी यांचे प्रतीक आहे. प्रीमियम ईव्हींकडे वाढत चाललेली ग्राहकांची प्रवृत्ती लक्षात घेऊन महिंद्रा BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी प्रारंभिक टप्प्यात फक्त पॅक थ्री चे सादरीकरण करेल. पॅक थ्री अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी महिंद्राने ‘थ्री फॉर मी’ नावाचा अभिनव कार्यक्रम सादर केला आहे. महिंद्रा फायनान्सद्वारे चालवला जाणारा हा कार्यक्रम सहा वर्षांनंतर बॅलून पेमेंटसह पॅक थ्री व्हेरियंट पॅक वनसारख्या मासिक ईएमआयवर खरेदी करण्याची संधी देतो.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय नाकरा म्हणाले, “आमच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीला ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांनी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी मजबूत आवड दाखवली आहे. म्हणूनच, आम्ही BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी फक्त 79 kWh पॅक थ्रीची नोंदणी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू करू. 79 kWh क्षमतेची बॅटरी 500 किमीपेक्षा जास्त प्रत्यक्ष रेंज देते. त्यामुळे ग्राहकांची रेंजबाबतची चिंता कमी होईल. प्रीमियम ईव्ही मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे ध्येय आहे आणि आमच्या “थ्री फॉर मी” अर्थसहाय्य कार्यक्रमाद्वारे आम्ही ही वाहने अधिक सुलभ करत आहोत. पहिल्या टप्प्यात आमचे मासिक विक्री लक्ष्य 5000 युनिट्स आहे.”
पॅक थ्री सह उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे सुलभीकरण
तंत्रज्ञान, सुरक्षा आणि आराम यांचा समतोल हवा असणाऱ्यांसाठी 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या अनलिमिट इंडिया कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी पॅक वन सादर करण्यात आला. प्रगत सुरक्षा, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रीमियम डिझाइन यांचा उत्तम मिलाफ साधत पॅक थ्री आरामदायी अनुभव आणि कामगिरीला नवीन उंचीवर नेतो. महिंद्राच्या अत्यंत कार्यक्षम INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित, या व्हेरियंटमध्ये 210 kW मोटर आहे. ती BE 6 ला 0-100 किमी/तास वेग 6.7 सेकंदांत, तर XEV 9e ला 6.8 सेकंदांत मिळवून देते. BE 6 साठी 683 किमी (MIDC भाग 1 आणि 2) आणि XEV 9e साठी 656 किमी (MIDC भाग 1 आणि 2) अशी प्रमाणित रेंज उत्कृष्ट उपयुक्तता सुनिश्चित करते. 175 kW डीसी चार्जरसह 20-80% चार्जिंग केवळ 20 मिनिटांत करण्याची जलद चार्जिंग क्षमता उपलब्ध आहे.
या एसयूव्हींच्या केंद्रस्थानी आहे MAIA—महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्चर असून ते प्रति सेकंद 50 ट्रिलियन ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8295 द्वारे समर्थित आणि 24 GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह, हे जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह ब्रेन आहे. भविष्यातील ड्रायव्हिंगचा अनुभव सुनिश्चित करत WiFi 6.0, ब्लूटूथ 5.2, Quectel5G आणि ओव्हर-द-एअर अपडेट्ससह, हे तंत्रज्ञान रियल टाईम अपडेट्स, अखंड कनेक्टिव्हिटी आणि अत्यंत वेगवान प्रक्रिया शक्ती पुरविते.
पॅक थ्रीची प्रमुख वैशिष्ट्ये:
· XEV 9e मधील वाइड सिनेमा-स्कोप: 110.08 सेंमीचा दृश्य अनुभव
· BE 6 मधील रेस-रेडी डिजिटल कॉकपिट
· VisionX: ऑग्मेंटेड रिअॅलिटी हेड्स अप डिस्प्ले (AR-HUD)
· इन्फिनिटी रूफ आणि लाइटमीअप अॅम्बियंट लाइट
· महिंद्रा सोनिक स्टुडिओ अनुभव: डॉल्बी अॅटमॉससह 16-स्पीकर हार्मन कार्डन साऊंड सिस्टम
· LiveYourMood: ए आर रहमान यांनी सिग्नेचर ध्वनी ट्यूनसह तयार केलेल्या Calm, Cozy आणि Club थीम्स. यात कस्टम ड्रायव्हर सीट, अॅम्बियंट लाइट आणि क्लायमेट कंट्रोल अॅडजस्टमेंट्स आहेत.
· मल्टी-ड्राईव्ह मोड्स: रेंज, एव्हरीडे, रेस आणि बूस्ट मोड
· 5 रडार्स आणि 1 व्हिजन सिस्टमसह ADAS स्तर 2+: प्राणी, पादचारी, बॅरिकेड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांना ओळखण्याची क्षमता
· आय डेंटिटी: ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टम (DOMS) चालकाला थकवा आला आहे का हे ट्रॅक करते. हे सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलसाठीही वापरले जाऊ शकते.
· Secure360: 360-डिग्री कॅमेरा आणि इन-केबिन कॅमेरासह सभोवताल ओळखतो व नोंद करतो. हे वाहनाच्या मोबाइल अॅपद्वारे लाइव्ह व्ह्यूसुद्धा पुरवते.
· ऑटोपार्क: 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्ससह परपेंडिक्युलर, अँग्युलर आणि पॅरलेल पार्किंगची सुविधा, रिव्हर्स असिस्टसह रिमोट-कंट्रोल पर्याय.
नाविन्यपूर्ण अर्थसहाय्य योजना:
‘थ्री फॉर मी’ कार्यक्रमाद्वारे BE 6 पॅक थ्री 39,224 रु. च्या मासिक ईएमआयवर उपलब्ध असेल, तर XEV 9e पॅक थ्री 45,450 रु. च्या मासिक ईएमआयवर उपलब्ध असेल. पॅक वन व्हेरियंट्सच्या ईएमआयसारखीच योजना आहे.
मॉडेल | बॅटरी | एक्स-शोरूम किंमत | विशेष EMI योजना | ||||
BE 6 पॅक थ्री | 79 kWh | 26.9 लाख रु * | 39 224 रु / महिना ^ | ||||
XEV 9e पॅक थ्री | 79 kWh | 30.5 लाख रु * | 45 450 रु / महिना ^^ |
^15.5% पर्यंत डाउन पेमेंट आणि सहा वर्षांच्या शेवटी 4.65 लाख रु.चे बलून पेमेंट
^^15.5% पर्यंत डाउन पेमेंट आणि सहा वर्षांच्या शेवटी 4.35 लाख रु.चे बलून पेमेंट
उपलब्धता आणि नोंदणी
BE 6 आणि XEV 9e पॅक तीन व्हेरियंटसाठीची नोंदणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होईल, तर चाचणी ड्राइव्ह 14 जानेवारी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होतील. डिलिव्हरी मार्च 2025 च्या सुरुवातीला अपेक्षित आहे.
इतर पॅक्स आणि पुढील टप्प्यातील नोंदणीसंबंधी माहिती मार्च 2025 च्या शेवटपर्यंत अद्ययावत केली जाईल.
महत्त्वाचे टप्पे | दिनांक | ||
आपली पसंती नोंदवा | 7 जानेवारी 2025 | ||
चाचणी ड्राइव्ह टप्पा 1: 6 शहरांमध्ये | 14 जानेवारी 2025 | ||
चाचणी ड्राइव्ह टप्पा 2: 15 शहरांमध्ये | 24 जानेवारी 2025 | ||
चाचणी ड्राइव्ह टप्पा 3: 45 शहरांमध्ये | 7 फेब्रुवारी 2025 | ||
बुकिंग सुरू (पॅक तीन) | 14 फेब्रुवारी 2025 | ||
डिलिव्हरी | मार्च 2025 सुरुवात |
*अस्वीकरण:
- किंमतींमध्ये चार्जर आणि त्याच्या जोडणीचा खर्च समाविष्ट नाही. 7.3 kW किंवा 11.2 kW पैकी कोणत्याही चार्जरचे बिलिंग स्वतंत्रपणे केले जाईल.
- लाइफटाइम बॅटरी वॉरंटी: उच्च-व्होल्टेज बॅटरी पॅकसाठी. केवळ प्रथम नोंदणीकृत मालकांसाठी वैध आणि खासगी नोंदणीवर लागू. मालकीत बदल झाल्यास, उच्च-व्होल्टेज बॅटरीवरची वॉरंटी पहिल्या डिलिव्हरीच्या तारखेपासून 10 वर्षे किंवा 200,000 किमी (जे आधी असेल) पर्यंत मर्यादित असेल. अधिक तपशील बुकिंगवेळी उपलब्ध केले जातील.