• डिजिटल पद्धतीने दहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत मुदत ठेवीत गुंतवा किमान १००० रुपयांची रक्कम आणि मिळवा ९.१ टक्क्यांपर्यंतचा व्याजदर.
•विविध बॅंका आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स यांसारख्या एनबीएफसी या दोन्हींमधून विविध प्रकारच्या वित्तपुरवठा पर्यायांची उपलब्धता.
• बँकांच्या ठेवींमधील गुंतवणूक असते सुरक्षित; या ठेवींना ‘डीआयसीजीसी’तर्फे मिळते ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण.
भारत, 08 जानेवारी २०२५ : टाटा डिजिटल कंपनीने आपल्या टाटा न्यू या प्लॅटफॉर्मवर फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस ही सुविधा सादर केली असून या माध्यमातून किरकोळ गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना ९.१ टक्क्यांपर्यंतच्या व्याजदराने आघाडीच्या वित्तीय संस्थांमध्ये मुदत ठेवींत गुंतवणूक करता येईल. त्याकरीता त्यांना बॅंकेच्या बचत खात्याची गरज लागणार नाही.
गुंतवणूक करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक सुलभ झाले आहे. ‘टाटा न्यू’चे ग्राहक आता कमीतकमी १००० रुपयांची गुंतवणूक अखंड डिजिटल प्रक्रियेद्वारे अवघ्या १० मिनिटांत करू शकतात. ग्राहकांची सुरुवातीच्या भांडवलाची रक्कम कितीही असली, तरी या सुविधेमुळे प्रत्येक ग्राहकासाठी आर्थिक सक्षमीकरणाचे दरवाजे उघडले जातील. थेट बॅंकांमध्ये होणाऱ्या या गुंतवणुकीवर ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) या संस्थेद्वारे ५ लाख रुपयांचा विमा मिळतो. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षितता आणि संपूर्ण मानसिक शांती मिळते.
टाटा डिजिटलचे वित्तीय सेवा विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी गौरव हजरती म्हणाले, “मुदत ठेव हा सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठीचा एक विश्वासार्ह पर्याय आहे. आमच्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आम्ही ग्राहकांना निश्चित परतावा व उच्च व्याजदर देणाऱ्या विश्वसनीय वित्तसंस्थांच्या सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. बाजारातील स्पर्धात्मक व्याजदर मिळवून देण्यासाठी हा साधा, सुरक्षित प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. त्याचा लाभ नवोदित आणि अनुभवी अशा दोन्ही गुंतवणूकदारांना होईल आणि त्यांना आपली संपत्ती सहजतेने वाढविण्याचा आत्मविश्वासही यातून मिळेल.”
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे डिजिटल बॅंकिंग विभागाचे प्रमुख विशाल सिंग या संदर्भात म्हणाले, “सूर्योदय’ने नेहमीच आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींसाठी स्पर्धात्मक व्याजदर दिलेले आहेत. आमच्याकडे मुदत ठेवींची योजना डिजिटल स्वरुपात आहे. ग्राहकांना ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू करता येते, तिचे व्यवस्थापन करता येते आणि ती ऑनलाईन पद्धतीनेच बंद करता येते. ‘टाटा डिजिटल’शी भागीदारी केल्याने आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास आणि नाविन्यपूर्ण योजना त्यांच्यापर्यंत नेण्यात मोठी मदत होणार आहे.”
‘श्रीराम फायनान्स’चे सीएफओ आणि व्यवस्थापकीय संचालक पराग शर्मा म्हणाले, “टाटा न्यू प्लॅटफॉर्मवर आमच्या मुदत ठेवी सादर करण्याकरीता आम्ही ‘टाटा डिजिटल’सोबत भागीदारी केली आहे. आम्ही महिला ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ व चांगला परतावा देत असतो. आमच्या या भागीदारीमुळे ग्राहकांना मुदत ठेवी ठेवण्याचा अखंडीत व सुरळीत अनुभव मिळेल.”
‘टाटा न्यू’च्या ‘फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस’मध्ये आणखी अधिक बँका सहभागी होणार असल्याने ग्राहकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यांना नियमित व पद्धतशीर गुंतवणूक करता यावी, यासाठी टाटा न्यू आवर्ती ठेवी (रिकरिंग डिपॉझिट) योजनादेखील सुरू करणार आहे.