बारामती, दि. ७: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, बारामती प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक अधिकारीपदी हनुमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी (६ जानेवारी) या पदाचा पदभार स्वीकारला.
श्री. पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव, बारामती, फलटण, दौंड व गडहिंग्लज तालुका तहसीलदार, उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यात नायब तहसीलदार या पदावर काम केले आहे. सेवा कालावधातील पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘आदर्श तहसीलदार’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, बारामती असा कार्यालयाचा पत्ता असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९६०००२६६७ असा आहे