पुणे- बिबवेवाडीत विद्यासागर हौ सोसायटी, महेश सोसायटी जवळ,अर्थव बंगला येथे केअरटेकर म्हणून काम करणा-या महिलेने साडे पंचवीस तोळे सोने चोरून नेल्या प्रकरणी तिला बिबवेवाडी पोलीसांनी केली आहे. गायत्री सुनिल हातेकर, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर धनकवडीअसे या अटक केलेल्या महिलेचे नाव असून सप्टेंबर २०२४ मध्ये तिने हि चोरीन केल्याचे पोलिसांनी सांगितले .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,दिनांक २६/०९/२०२४ रोजी ते दिनांक ०१/१०/२०२४ रोजी , बिबवेवाडी पुणे येथे ‘एक फिर्यादी’ यांचे आईचे घरातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने २५.५ तोळे वजनाचे संमतीशिवाय चोरून नेले म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिली होती त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.२३३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये दिनांक ०१/१०/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शोध चालू असताना पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून महिला नामे गायत्री सुनिल हातेकर, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर धनकवडी पुणे हिस ताब्यात घेवून तिचेकडे तपास करता सदर महिला ही सप्टेंबर २०२४ मध्ये फिर्यादी याचे आईकडे केअरटेकर म्हणून कामास असताना तिने त्यांचे कपाटातून सोन्याचे दागिने चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेने तिच्या कडे अधिक तपास करून तिचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेले दागिन्यापैकी तपासान्वये ८,७०,०००/- कि. रू.ची एक सोन्याची लगड वजन १४६ ग्रॅम हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पो.स्टे.श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे, बिबवेवाडी पोलीस चौकी अधिकारी सपोनि संजय निकुंभ, पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, मपोहवा गोकुळा काटकर यांनी केलेली आहे.

