पुणे -आयुक्तसाहेब ,सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा आपली प्रशासनावरील पकड ढिली होऊ देऊ नका अशी सूचना आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी हा इशारा दिला .पुणे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे शहरातील विकासकामे किंवा प्रभागातील मूलभूत कामे ठप्प झाली होती. ती लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत. त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, विद्युत खांब बसविणे, ड्रेनेज, पाणी पुरवठा, विविध रस्ते, वाहतुकीचे प्रश्न यांसह विविध प्रमुख विभागामध्ये असलेली नागरिकांची दैनंदिन कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा.आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे संबधित विभाग प्रमुखांना निर्देश दिले. या प्रसंगी शहराध्यक्ष , माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,राहुल कांबळे , पदाधिकारी आदी उपस्थित होते.