पुणे : स्वामी विवेकानंद आणि विश्वशांतिदूत महर्षी विनोद यांची जयंती तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग-गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्या सुवर्णसाधनेच्या अमृतयोग वर्षानिमित्त येत्या १२ जानेवारीला ‘महा-ध्यान शिबिर’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी नऊ ते एक या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या महाध्यान शिबिरात ध्यानाचे स्वरूप, त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध, मानसिक ताणाचे नियोजन, अशा विविध विषयांची ओळख करून देण्यात येणार आहे.
या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी मंत्री दिवाकर रावते, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. येथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. https://forms.gle/iZ6qNQ 552dN CuS1z7. या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.