पुणे-
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी झाली.या हत्येला जवळपास २६ दिवसांचा कालावधी झाला आहे.या संपूर्ण कालावधीत संशयित आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले,सुधीर सांगळे यांच्यासह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.तसेच या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला जात आहे.
आज पुण्यातील लाल महाल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबांतील सदस्य सहभागी झाले होते.तसेच यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लाल महालमधील जिजाऊ च्या पुतळ्यास अभिवादन देखील केले. मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे यांचा सह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच पुणे जिल्हय़ातील विविध भागातील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे,मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या,कर्तव्यात कसूर करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे,मु.पो.बिहार (बीड) या आशयाचे फलक घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली .
संतोष देशमुखांच्या हत्येची सुरूवात एप्रिलमध्येच, मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धसांनी तारीख वार सगळंच सांगितलं आहे
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरूवात एप्रिल-मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलं आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात मे ते एप्रिल महिन्यापासून झाली आहे. आमच्याकडे कंपन्या येऊ लागल्या. नितीन बिक्कड याने स्वत:च्या पायाला गोळी मारून घेतली. कपंनीवर गुन्हा दाखल केला आणि कोर्टापर्यंत. पुढे हे सिद्ध झालं तरी कंपनीवाले म्हटले मिटवून टाका. तिथून पुढे बिक्कड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात वावर वाढत गेला. कंपन्यांच्या सिक्युरिटीचे काम घेऊ लागला. यादरम्यान त्याची वाल्मिक कराडसोबत भेट झाली. वालूबाबा, आकाची मीटिंग झाली. १९ जूनला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांची परळीमधील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. आवादा कंपनीच्या शुक्ला यांना घेऊन नितीन बिक्कड परळीला वाल्मिक कराडकडे गेला. कंपनीवाले धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, ही बाब कराडला समजली. कराड मुंडे यांचे पीए देशमुख यांना काय म्हणायचं ते म्हणल्याचं धस यांनी सांगितलं.आय कंपनीची मीटिंग मुंबईला धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक ठरली. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी, शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली. यावेळी तीन करोडची डील झाली. आका बोलले ३ कोटी द्या, यावेळी कंपनीचे अधिकारी बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना सांगितलं. मात्र वरिष्ठांनी त्यांना २ करोडमध्ये फायनल करा असं सांगितलं. अधिकारी त्यांना बोलले की २ कोटी त्यावेळी जाताना ते म्हटले की पुढे ठरवू. पण निवडणुकीच्या काळात ५० लाख आकानी घेतले की बडे आकाने घेतले मला माहित नाही. सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे.

