पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला जागर समिती (पुणे) आयोजित व्हय मी सावित्रीबाई! नाटक शनिवार, 4 जानेवारी रोजी संध्या 5.30 वा. महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे झाले. नाटकाचे लेखन अभिनेत्री सुषमा देशपांडे यांचे असून शिल्पा साने आणि शुभांगी भुजबळ यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. शुभांगी भुजबळ म्हणाल्या की महिला जागर समितीमुळे अगदी फुले वाड्यात हा प्रयोग करायला मिळणं हे आमचं आम्हाला भाग्य वाटतं. नाटकाच्या निमित्ताने फुले वाडा पाहता आल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्या.


