निसर्गछाया ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या वतीने आयोजन ; गायक जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांचे सादरीकरण
पुणे : ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे,’ ‘ऋतु हिरवा,’ ‘मोह मोह के धागे,’ ‘बाहो में चले आओ,’ ‘पुकारता चला हूँ मैं,’ आणि ‘अभी न जाओ छोड़कर’ या हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणांनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. गायक व संगीतकार जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूगाव येथील “निसर्गछाया” ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्रात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या संगीतमय मैफलीचा आस्वाद घेतला. केंद्राच्या संचालिका अमृता देवगांवकर आणि मंदार देवगांवकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
‘अश्विनी ये ना,’ ‘धुंदमधुमती नाच रे नाथ रे,’ ‘कानडा राजा पंढरीचा, देहाची तिजोरी,’ आणि ‘कळीदार कपुरी पान’ या मराठी गाण्यांबरोबरच ‘गाता रहे मेरा दिल,’ ‘होठों पे ऐसी बात,’ ‘इन्ही लोगो ने,’ या गीतांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. ज्येष्ठ नागरिकांकरिता पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संचालिका अमृता देवगांवकर यांनी सांगितले.