जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, न-हे, पुणे तर्फे आयोजन ; सहा क्रीडाप्रकारांचा सहभाग
पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, तर्फे दुस-या जाधवर आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ ते ११ जानेवारी २०२५ दरम्यान मानाजीनगर न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल – १ येथे या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. महोत्सवांतर्गत विजेते खेळाडू व संघांना ८० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडा महोत्सवांतर्गत सहा क्रीडा प्रकारांत स्पर्धा होणार आहेत. इनडोअर मध्ये बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि तायक्वांदो तसेच आऊटडोअर मध्ये व्हॉलिबॉल, रस्सीखेच, कबड्डी या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत १४ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील अशा दोन गटांत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, शालेय अभ्यासाप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे संस्थेतर्फे जाधवर करंडक, विविध स्पर्धा, युवा संसद यांसह आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील स्पर्धक तसेच शाळांचे संघ सहभागी होत आहेत. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, याकरिता अशा महोत्सवांचे आयोजन संस्था सातत्याने करीत आहे.
महोत्सवात सहभागाची अंतिम तारीख ४ जानेवारी असून ८२०८८४८२४४, ९६३७८०५१४३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.