एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधुर गायनाने समारोप

Date:

पुणे, दि. १ जानेवारी : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड,  प्रा.स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. सुनीता कराड, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा उपस्थित होते.
३१ डिसेबर रोजी झालेल्य‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ च्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२ वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२५ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. तरुणांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”
या संगीत महोत्सावात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या नृत्यशिक्षिका आदिती रिसवाडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर एमआयटी एडीटीयूच्या विद्यार्थ्यांनी संथाल लोकनृत्य सादर केले. विश्वशांती संगीत कला अकादमीचे विद्यार्थी व प्रा. अंकित गुप्ता यांचा भक्ती संगीत व हिंदी चित्रपटांचे सुवर्णकाळ त्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम झाला. प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत गायन, वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे यांचे गायन झाले. सरतेशेवटी पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रा. स्वाती कराड चाटे यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...