पुणे-या डिसेंबर महिन्यात मिळकतकर थकबाकीदारांकडून ७१ कोटीची वसुली केल्यावर आता सन २०२४ च्या अंतिम सूर्यास्ताच्या समयी पुणे महापालिकेने नव्या वर्षात मिळकत कर थकबाकीदारांचे नळजोड तोडणार असा स्पष्ट इशारा दिला आहे.
या संदर्भात मिळकतकर विभागप्रमुख महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी म्हटले आहे कि,’मिळकत कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असून, त्यातूनच शहरातील विकास कामे होत असतात. कर आकारणी व कर संकलन खात्यास सन २०२४-२५ मध्ये दिलेले मिळकत कर जमा करण्याचे उद्दीष्ट पुर्ततेसाठी थकवाकी वसूलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने दि. २/१२/२०२४ पासून मिळकत कर वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून, त्यांचे मार्फत दररोज निवासी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकतकर वसूलीची कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने दि. ०२/१२/२०२४ पासून मिळकत कर बमुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून त्यांचे मार्फत दररोज निवानी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकत कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. आज मितीस र.रु.७१,४१,८५,३९३/- एवढी मिळकतकराची थकबाकी या पथकाद्वारे वसूल करण्यात आली आहे.
परंतू अद्यापही नागरीकांचा/व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येत नाही. त्या अनुषंगाले ‘उद्या दि १/१/२०२५ रोजी पासून मध्यवर्ती वसूली पथकांसोबत १ प्लंबर, ३ बिगारी सेवक व त्या-त्या विभागातील विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक तमेच प्रत्येक झोन निहाय एकूण ५ पथके यांचे मार्फत थकबाकीदार मिळकतीचे नळजोड तोडण्याची कार्यवाही करण्यात येणार असून मिळकत कराच्या थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्या नंतरच सदरचे नळजोड पूर्ववत करण्यात येणार आहेत.
तरी सर्व निवासी/बिगर निवासी मिळकतधारकांस याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मिळकत कराची थकवाची त्वरीत भरून नळजोड तोडण्याची कारवाई टाळावी व प्रशासनास मिळकत कराचे उदिष्ट साध्य करणेसाठी सहकार्य करावे,