पुणे दि. ३१: पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ५.३० वा. गांधी सभागृह, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे पेन्शन मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्हा कोषागाराच्यावतीने निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन विषयक प्रश्नांविषयी विचार विनिमय व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांना पेन्शन मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात आले आहे.