Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्रीपाल सबनीस म्हणजे दु:खाला वाचा फोडणारे मानवतावादी साहित्यिक : चंद्रकांत दळवी

Date:

ईश्वराबाबत मी अज्ञेयवादी : डॉ. श्रीपाल सबनीस
‌‘विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस‌’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

पुणे : डॉ. श्रीपाल सबनीस हे संवेदनशील मन जपणारे परंतु त्याच वेळी चळवळी वृत्ती असणारे समाजाच्या वेदना, प्रश्नांना पाहून त्यांच्या परिहारार्थ झटणारे, दु:ख-दैन्याला वाचा फोडण्यासाठी कार्यरत असणारे साहित्यिक आहेत, अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी डॉ. सबनीस यांचा गौरव केला. बुद्धीवादी आणि बुद्धवादी याने जात मानू नये. संतत्वामधील चांगुलपणाची बेरीज करत मर्यादा वजा करणारा मी ईश्वराबाबत अज्ञेयवादी आहे, अशा भावना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केल्या.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‌‘विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस‌’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (दि. 31) आयोजित करण्यात आला होता. गौरवग्रंथाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (भा. प्र. से.) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख अध्यक्षपदी होते.

डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे (भा. प्र. से.), दै. केसरीचे सहसंपादक रामदास नेहुलकर, संस्कार मंदिर संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक स्वप्नील गायकवाड गौरव ग्रंथांचे संपादक शिरीष चिटणीस, यशोदीप पब्लिकेशनच्या प्रा. रुपाली अवचरे, निखिल लंभाते मंचावर होते.
चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले, सबनीस यांचे व्यक्तीमत्व साधेपणाला मर्यादा नसणारे आहे. त्यांना पाहण्यापेक्षा त्यांचे साहित्य वाचणे महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांचा लढवैय्या वारसा घेऊन ते पुढे आलेले आहेत. गौरवग्रंथात समाविष्ट असलेल्या विविध लेखकांच्या लेखांविषयी दळवी यांनी याप्रसंगी टिप्पणी केली.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. देशमुख यांनी सबनीस या नावाची ‌‘स‌’ म्हणजे सर्वोत्तम साहित्यिक, ‌‘ब‌’ म्हणजे बहाद्दूर, ‌‘नी‌’ म्हणजे निरलस आणि निगर्वी तर ‌‘स‌’ म्हणजे समयसूचक आणि समीक्षक अशी फोड करत ते पुढे म्हणाले, साहित्याचे उत्तम समीक्षण व सत्य मांडणारे प्रेरणादायक साहित्यिक आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस हे साहित्यावर निष्ठा असणारे मानवतावादी अष्टपैलू लेखक आहेत. ज्वलंत ज्ञानकोश असलेल्या डॉ. सबनीस यांना वाचक, सुहृदांतर्फे साहित्यरत्न पदवी बहाल करावी, असे आवाहनही केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मी मांडत असलेल्या भूमिकेवर सर्व जाती-धर्म-पंथातील व्यक्तींनी प्रेमच केले हे आनंददायी आहे. मानवतावादाच्या भूमिकेतून मी प्रत्येक समाजातील चांगुलपणाची, ज्ञानाची, सत्याची, संचिताची, शहाणपणाची बेरीज करायला शिकलो आहे.
रामदास नेहुलकर म्हणाले, सामाजिक प्रबोधन घडविणारा, माणसात राहणारा, वावरणारा ज्ञानवंत, विचारवंत असा साहित्यिक म्हणजे श्रीपाल सबनीस होय.
जीवननिष्ठेप्रती प्रामाणिक असणारे, शोषित वर्गाबद्दल कणव असणारे आणि देशाला, समाजाला दिशा देताना स्पष्टपणे मते मांडणारे डॉ. श्रीपाल सबनीस आहेत, असे मत श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वप्नील गायकवाड म्हणाले, समाजात अनेक साहित्यिक असले, त्यांची साहित्यिक मूल्ये मोठी असली तरी श्रीपाल सबनीस हे या गुणांव्यतिरिक्त मानवतावादी, प्रेमळ, संवेदनशील व्यक्ती आहेत. आजच्या काळात भावनांक कमी होत असताना देखील सहवेदना आणि संवेदना जपणारे आहेत.
स्वागतपर प्रास्ताविकात शिरीष चिटणीस म्हणाले, हा गौरवग्रंथ हे समाजाचे धन असून शहरांचा इतिहास आहे. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचारधन सामान्यांपर्यंत पोहोचावेत, समाजप्रबोधन व्हावे या विचाराने या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. रुपाली अवचरे यांनी मनोगत व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करा; शासन तुमच्या पाठीशी आहे— डॉ. नीलम गोऱ्हे”

चंद्रपूर, दि. ११ : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना...

जलसंधारण खात्याचा आकृतीबंध न उठल्यास संजय राठोडांना छत्रपती संभाजीनगरात प्रवेशबंदी!

वाल्मी येथील रोजगार सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा छत्रपती संभाजीनगर :राज्यातील लाखो...

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️ _विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे...

पुणे महापालिका निवडणूक :मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना अर्ज वाटप आणि स्वीकृती

पुणे महानगर पालिका निवडणूक २०२६ साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने...