अतुलनीय अचूकतेने करण्यात येणारी आणि रुग्णांना सुधारित परिणाम मिळवून देणारी क्रांतिकारी प्रक्रिया
पुणे, ३० डिसेंबर, २०२४: सह्याद्रि हॉस्पिटल्सने डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच वापरून पुण्यातील पहिले रोबोटिक-असिस्टेड हिप रिप्लेसमेंट यशस्वीपणे करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये क्रांतिकारी यश नोंदवल्याची घोषणा केली आहे. साताऱ्याचे रहिवासी असणारे, ६५ वर्षांचे सेवानिवृत्त, श्री ज्ञानेशराव प्रधान (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना हिपचे अवस्क्युलर नेक्रोसिस झाल्याचे निदान झाले होते ज्यामध्ये मांडीच्या हाडाचे टिश्यू अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे कमजोर होतात.
सह्याद्रि हॉस्पिटल्समधील कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ अभिजित आगाशे यांच्या तज्ञ देखरेखीखाली, २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ही सर्जरी करण्यात आली आणि ऑपरेशननंतर तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होत असल्याची खात्री झाल्यावर, श्री प्रधान यांना २ डिसेंबर २०२४ रोजी घरी पाठवण्यात आले. रिअल इंटेलिजन्स रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा वापर करून अतुलनीय अचूकता व सुरक्षिततेसह सर्जरी करून या क्षेत्रात नवे मापदंड रचले आहेत.
डॉ अभिजित आगाशे यांनी या क्रांतिकारी तंत्राच्या लाभांविषयी माहिती दिली, ते म्हणाले, “हिप रिप्लेसमेंटच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेमध्ये रोबोटिक-असिस्टेड डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोचमुळे अधिक अचूक व कमी इन्व्हेसिव्ह सर्जरी करता येते. रुग्णांना कमी वेदना सहन कराव्या लागतात, तब्येत वेगाने सुधारते आणि सर्जरीनंतर कमी वेळात अधिक नैसर्गिक हालचाली करता येतात. या तंत्रामुळे रुग्णांना सर्जरीनंतर मांडी देखील घालून बसता येते. हिपच्या समस्यांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष लाभदायक ठरते. या पद्धतीचे अधिक चांगले फंक्शनल परिणाम मिळतात, इतकेच नव्हे तर सर्जरीनंतर लगेचच हालचाली करता येतात, एव्हीएन हिपच्या रुग्णांची जीवन गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात सुधारते.”
डॉ आगाशे पुढे म्हणाले, “रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा मिलाप सांधे बदलण्याच्या सर्जरीमध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतो. ऑपरेशनच्या आधीची माहिती रोबोटिक सिस्टिममध्ये फीड करण्याच्या क्षमतेमुळे प्रत्येक रुग्णासाठी कस्टमाइज्ड सर्जरी प्लॅन तयार करता येतो, जो त्यांच्या विशिष्ट ऍनाटॉमीनुसार तयार करण्यात आलेला असतो, त्यामुळे अतिशय अचूक अलाइनमेंट व लेग लेंग्थ मिळते, यामध्ये अगदी मिलिमीटर देखील अचूकपणे मोजले जातात.”
आरोग्य देखभालीचे अधिक चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर करण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे करून रोबोटिक-असिस्टेड सर्जरी हे हिप रिप्लेसमेंटमध्ये नवे मानक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे.