पुणे: जिल्हा स्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ने पदकांची लयलूट केली. येथे झालेल्या योगासन क्रीडा स्पर्धेत स्कूल ने एकूण ६ पदके जिंकली असून त्यापैकी ३ सुवर्ण व ३ रौप्य पदकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या वतिने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘योगासन’ स्पर्धा नुकतीच जुन्नर येथील बेल्हे बांगरवाडीच्या समर्थ कॉलेजमध्ये संपन्न झाली. १४ व १९ वर्षवयोगटातील खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आपली प्रतिभा दाखविली. अंडर १४ मुलांमध्ये मेधांश बहादुर हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तर अंडर १४ मुलींमध्ये महिका पटवर्धन हिने १ सुवर्णपदक व १ रौप्यपदक पटकावले. तसेच अंडर १९ मुलींमध्ये सई कुलकर्णी ला सुवर्णपदक मिळाले.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करणार्या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी म्हणाले, आजपर्यंत योगासने केवळ रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानली जात आहेत. मात्र योग हा खेळ नसून प्रथमच अंगीकारून ध्रुव येथील हुशार विद्यार्थ्यांनी त्याला नवे रूप दिले आहे. तसेच स्कूलच्या प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.
प्रशिक्षक वैष्णवी आंद्रे, प्रगती देशमुख आणि वैष्णव कोरडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.