नवी दिल्ली–दिल्लीतील नवीन संसद भवनाजवळील रेल्वे इमारतीसमोर बुधवारी दुपारी एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर भाजला आहे.दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.35 वाजता कॉल आला. यामध्ये तरुणाने आग लावून घेतल्याची चर्चा होती. आम्ही एक वाहन घटनास्थळी पाठवले होते.
अधिकाऱ्याने सांगितले की, संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना घटनास्थळावरून पेट्रोल, जळालेली पिशवी आणि बूट सापडले. तरुणाने ज्या ठिकाणी स्वतःला पेटवून घेतले त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सध्या तरुणाची माहिती समोर आलेली नाही.