मुंबई-– संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकार वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मीक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा.
आव्हाडांचे ट्विट काय?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, चलो बीड ! दिनांक 28 डिसेंबर!! सकाळी 11.00 वाजता संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ भव्य मोर्चा ! महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे, तुम्ही पण या. कदाचित, मोर्चाला घाबरून सरकार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मिक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की, संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हत्यांच्या मागे कोण आहे? असे असूनही सरकार शांत झोपलेय. सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी चलो बीड !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.