(Sharad Lonkar)

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेला ‘मिशन ग्रे हाऊस’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 17 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल आणि ॲक्शनचा परिपूर्ण मेळ आहे.
टीझरच्या सुरुवातीला पांढऱ्या टी-शर्टमध्ये एक मध्यमवयीन माणूस एका अंधाऱ्या बंगल्यात भीतीने भरलेला दिसतो. अचानक घराच्या दारात डोक्यापासून पायापर्यंत झाकलेला गूढ व्यक्ती भिंग घेऊन उभा राहतो. काही क्षणांतच या व्यक्तीचा खून होतो, आणि गूढतेची कथा उलगडण्यास सुरुवात होते.
यानंतर, कबीर राठोडची दमदार एंट्री होते. पोलिसांच्या गणवेशात मोटरसायकलवरून आलेला कबीर गुन्हेगारांशी लढताना दिसतो. ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्या हत्येचा सीन, रहस्यमय खुनी हातात रक्तमाखलेला चाकू घेऊन उभा असलेला क्षण, आणि अनुभवी कलाकार किरण कुमार व राजेश शर्मा यांची चिंता या सगळ्यामुळे टीझर रोमांचक बनतो. टीझरच्या शेवटी कबीर आणि मिस्ट्री मॅनमधील तीव्र संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

दिग्दर्शक नौशाद सिद्दीकी म्हणतात, “‘मिशन ग्रे हाऊस’ हा चित्रपट एक अनोखी कथा घेऊन येत आहे. या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन आणि ड्रामाचा उत्तम संगम आहे. अबीर खान या तरुण अभिनेत्यासाठी ही एक मोठी संधी आहे, तर अनुभवी कलाकारांच्या सहयोगामुळे कथा अधिक इम्प्रेसिव झाली आहे.”
मिशन ग्रे हाऊस, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली, युवा अभिनेता अबीर खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तसेच पूजा शर्मा देखील टेलीविजन नंतर बॉलीवूडमध्ये एंट्री करत आहे. त्याच्यासोबत चित्रपटात दिग्गज कलाकार रझा मुराद, किरण कुमार, राजेश शर्मा, आणि निखत खान महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अनुभवाने आणि अप्रतिम अभिनया मुळे चित्रपट मनोरंजक बनवला आहे.
चित्रपटाचे संगीत एच. रॉय यांनी दिले आहे. सुखविंदर आणि शान यांसारख्या प्रसिद्ध गायकांची गाणी चित्रपटात आहेत, ज्यामुळे हा चित्रपट एक म्युझिकल थ्रिलर ठरतो. चित्रपटाची कथा झेबा के. यांनी लिहिली आहे. लोणावळा आणि पुणे या ठिकाणी चित्रपटाची शूटिंग करण्यात आलीआहे. ‘मिशन ग्रे हाऊस’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 17 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

