नवी दिल्ली-मतदानाच्या नियमांमधील बदलांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या (ECI) स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे.एक्सवर एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले- यापूर्वी मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलमधून CJI ना काढून टाकले होते आणि आता ते लोकांपासून निवडणुकीची माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मतदार यादीतून नावे वगळण्याबाबत आणि ईव्हीएममधील पारदर्शकतेबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला जेव्हा जेव्हा पत्र लिहिले तेव्हा ईसीआयने अपमानास्पद स्वरात उत्तर दिले आणि आमच्या तक्रारीही स्वीकारल्या नाहीत.
खरेतर, 20 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही, वेबकास्टिंग फुटेज आणि उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यांसारखी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करणे टाळण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये बदल केले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एआयच्या वापराने मतदान केंद्राच्या सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाड करून बनावट कथा पसरवल्या जाऊ शकतात. बदलानंतरही हे उमेदवारांना उपलब्ध राहतील. इतर लोक ते मिळविण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात.

