बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.. काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर अजितदादा रात्री उशिरा बारामतीमध्ये दाखल झाले.. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.. आज अजितदादा बारामतीत आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी बारामतीकरांच्या वतीने अजितदादांचा नागरी सत्कार होणार आहे..
प्रथमतः मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची त्यांनी पाहणी केली. महाविद्यालयातील साधनसामग्री, सोयीसुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या महाविद्यालयात आयुर्वेदिक पध्दतीनं उपचार पध्दतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. दरम्यान, याधीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरू झालं असून तिथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात आता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची भर पडल्यानं वैद्यकीय शिक्षणाचा हब म्हणून बारामतीची ओळख निर्माण होईल, यात शंका नाही. आयुर्वेदिक पध्दतीच्या उपचारांची आवश्यकता भासणाऱ्या सर्व रुग्णांना या महाविद्यालयात अत्याधुनिक सोयीसोविधा पुरवल्या जातील. याबरोबरच रुई येथील शासकीय रुग्णालयाच्या कामाची देखील पाहणी केली.त्याचप्रमाणे श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, मारुती मंदिर आणि कऱ्हा नदी परिसरातील कामांची पाहणी केली. यासह विद्या प्रतिष्ठान येथील एआय सेंटरच्या कामाचा देखील आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कामाबाबतची माहिती जाणून घेतली. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.