मुंबई: सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्याबाबत माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकृती दिल्याची माहिती आज स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाला दिल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे स्थळ ,स्वरूप, वेळ तसेच इतर रूपरेषा महामंडळ, संयोजक संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर लवकरच जाहिर केली जाईल असेही प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार
Date:

