मुंबई-
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी 11.322 किलोग्राम हायड्रोपोनिक विड (गांजा) जप्त केला. या कारवाईत सुमारे 11.322 कोटी रुपयांचे अवैध अंमली पदार्थ, ट्रॉली बॅगेच्या आत हवाबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेले आढळले.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशय आल्यानंतर तात्काळ कारवाई करून बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अडवले, त्याची कसून तपासणी केली आणि त्याच्याकडे लपवलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 अंतर्गत या प्रवाशाला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.