परभणी-मस्साजोगनंतर शरद पवार यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दरम्यान शरद पवार म्हणाले की, शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार झाला तो अतिशय धक्कादायक आहे. सोमनाथ यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यांना ज्यांनी मारले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सोमनाथ यांच्या मृत्यू प्रकरणी वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी ह्या मुद्द्यावर चर्चा केली. सोमनाथ यांचा गुन्हा काय होता. माझ्या माहितीनुसार जे आंदोलन झाले ते शांततेत झाले होते. आंदोलन शांतेत असताना पोलिसांनी यांना सर्वांना अटक केली. यानंतर शरद पवार यांनी परभणीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कुटुंबाची भूमिका काय हे जाणून घेतल्यानंतर सरकारशी मला बोलता येईल. त्यासाठीत मी आलो आहे. घडलेली घटना गंभीर आहे.
शरद पवार म्हणाले की, जे सगळं घडले ते सर्वांना धक्का देणारे आहे. महाराष्ट्र विधानसभेत अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. तुमची जी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ही तुमची मागणी मी राज्य सरकारकडे पोहचवणार आहोत. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही ही तुमची भूमिका अगदी योग्य आहे.
सोमनाथ सूर्यवंशी याला काहीच आजार नव्हता. त्यांचा खून करण्यात आला आहे. तो आंदोलनात नसताना त्याला अटक करण्यात आली. सोमनाथचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिला. 5 दिवसांमध्ये मारहाण करत ज्यांनी माझ्या मुलाचा खून केला त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या 5 दिवसात आम्हाला काहीच माहिती दिली नाही. डायरेक्ट त्याचे निधन झाल्याचा फोन आला.
आम्ही त्यांची बॉडी ताब्यात घेण्यासाठी गेलो असता आम्हाला सोमनाथच्या अंगावर व्रण दिसून आले. त्याला पोलिस ठाण्यात मारले नाही. बाजूला एका रुममध्ये नेत मारहाण करण्यात आली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल दिलेली सर्व माहिती खोटी आहे.