पुणे, दि. २०: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीकरीता उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस (सी.डी.एस) परीक्षेची पूर्व तयारीच्याअनुषंगाने २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे यांनी दिली आहे.
प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहेत. प्रवेशाकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. लोकसंघ आयोग नवी दिल्ली मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. परीक्षेकरिता ऑनलाईनपद्धतीने अर्ज केलेला असावा. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १५ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीच्यावेळी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in संकेतस्थळावर सीडीएस ६४ प्रशिक्षणाकरीता किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांनुसार प्रती व ते पूर्ण भरून तीन प्रती सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक training.pctonashik@gmail.com या ईमेल पत्त्यावर व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉटसअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल श्री. हगे यांनी केले आहे.