पुणे- येथील नांदेड सिटी पोलीसांनी सराईत गुन्हेगार साजन विनोद शहा,आणि कुणाल शिवाजी पुरी यांना 02 गावठी पिस्टल व 01 जिवंत काडतूस सह पकडले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार साजन शाहा व कुणाल पुरी यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी पिस्टल असून दोघे आंबाईदरा येथे येणार आहेत वगैरे खात्रीशीर बातमी मिळण्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेडसिटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी वअंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून साजन विनोद शहा वय 19 वर्षे रा.धायरी गाव भैरवनाथ मंदिरा जवळ फ्लॅट नं.302 पोकळे क्रिस्टल बिल्डिंग धायरी पुणेकुणाल शिवाजी पुरी वय.18 वर्ष रा. फ्लॅट नंबर 2 विश्व कॉर्नर बिल्डिंग भैरवनाथ मंदिरा सामोरं धायरी पुणे
यांचेकडून कि. रु 70,500/- चे 02 गावठी पिस्टल व 01जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.आहे यातील साजन शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे एकूण 06 गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीणकुमार पाटील , पोलिस उप आयुक्त परिमंडळ -3 संभाजी कदम , सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार – पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे, यांच्या पथकाने केली आहे