नागपूर -कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली ती दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. महाराष्ट्रात मराठी-अमराठी, जाती-जातीचा जो वाद सुरू आहे, त्याला महायुतीचे सरकारच्या काळात वाढले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणसांना सोसायटीमध्ये घरे दिली जात नाही. मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि मग देशाची आर्थिक राजधानी. राज्यातील प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसांचा आहे. आमच्या राज्यात वेगवेगळ्या राज्यातील लोकं राहत आहेत. पण जर आम्हाला कुणी माज दाखवला तर मराठी तरुणांनी त्याला न्याय दिला तर पोलिसांनीमध्ये येऊ नये.आदित्य ठाकरे म्हणाले की, कल्याणमधील मराठी माणसावर हत्याराने हल्ला करण्यात आला. कोण तो शुक्ला की कोण त्यांचे तोंड कुणी सुजवले, हातपाय तोंडले तर पोलिसांनीमध्ये येऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतो की त्याला एमटीडीसीमधून बडतर्फ करत हे पार्सल जिथून आला तिथे त्याला परत पाठवून द्या.आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी असा वाद कधीच झाला नाही. अनेक भाषिक लोकं महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे राहत आहेत पण असा प्रकार कधीच झाला नाही. गेली 2 अडीच वर्षे शिंदे- फडणवीस यांच्या सरकारच्या काळात हे प्रकार वाढल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या परंपरेत मास मच्छी खातो, कुणी व्हेज सोसायटी करण्याचा प्रयत्न केला किंवा मराठी माणसाला घरे देण्यास नकार दिला तर त्या सोसायटीची ओसी रद्द केली पाहिजे. जर कुणी मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर कुणी दादागिरी करत असेल तर पोलिसांनी त्याला दांडा काय आहे, हे दाखविले पाहिजे.आदित्य ठाकरे म्हणाले की, परिसराचे नाव बदलण्याची गरज काय आहे, बऱ्याच ठिकाणी परिसरांचे नाव बदलण्याचा प्रकार सुरू आहे. भाजपच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग आहे. ते राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचा फोटो आम्ही सोबत घेऊन जाऊ शकतो ना त्यांच्याबद्दल भाजपच्या मनात इतका राग का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.