पुणे-परभणी येथे पोलीसांच्या मारहाणीमुळे उच्च शिक्षित सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याच्या चौकशीबाबत व केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.
निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘परभणीमध्ये झालेला प्रकार निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटूंब उघड्यावर पडले असून त्याच्या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे व त्याला ज्या ज्या पोलीसांनी मारहाण केली त्याच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे कारण पोस्टमॉटम अहवालामध्ये तसा स्पष्ट उल्लेख पोलीसांनी मारहाण केल्याचा आलेला आहे तसेच आंदोलकांवर जे खोटे गुन्हे व कलमे पोलीसांनी दाखल केले आहेत ते त्वरीत मागे घेवून आंदोलकांची सुटका करावी.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या सडक्या मेंदूतून व त्यांच्या RSS च्या वळचळणीत त्यांची उठाठेव असल्यामुळे त्यांचा कायमच दलितांबद्दल आकस आहे. त्यातूनच काल राज्यसभेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी त्वरीत माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’’
यानंतर माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच संपूर्ण देशात लोकशाहीचे राज्य असून सर्व जाती धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने संपूर्ण देशात राहत आहेत. बाबासाहेबांची महिमा तडीपार अमित शहाला काय कळणार असे बागवे यांनी सांगितले.’’
सदर आंदोलनात प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, प्रदेश प्रतिनिधी मेहबुब नदाफ, पुणे शहर काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, प्रकाश पवार, सतिश पवार, नितिन परतानी, प्रियंका रणपिसे, राजेंद्र मोहिते, अनिल जाधव, सुनिल काकडे, लतेंद्र भिंगारे, विनोद रणपिसे, रमेश सोनकांबळे, संजय कवडे, ॲड. राजश्री अडसूळ, सुंदरा ओव्हाळ, माया डुरे, देविदास लोणकर, अर्चना शहा, सीमा सावंत, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, अविनाश अडसुळ, उहर्षद हांडे, सुरेश चौधरी, नुर शेख, संतोष हंगरगी, अनुसया गायकवाड, आदीसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलना नंतर अप्पर जिल्हाधिकारी, पुणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.