नवी दिल्ली: ओमान देशाने भारताकडून अंडी आयात करण्याच्या नव्या परवाना देण्यास बंद केले आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूतील नमक्कल पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते. कतारने काही दिवसांपूर्वी भारतीय अंड्यांवर वजन संबंधी प्रतिबंध घातले होते. आता त्यांनी नवे प्रतिबंध घातले आहेत. डीएमके खासदार केआरएन राजेशकुमार यांनी मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
भारताकडून पुन्हा एकदा अंड्यांची आयात सुरू व्हावी यासाठी ओमान आणि कतारच्या अधिकाऱ्यांशी केंद्र सरकारने चर्चा करावी अशी मागमई राजेशकुमार यांनी सभागृहात केली. आयात बंदीमुळे पोल्ट्री चालवणारे शेतकरी आणि निर्यातदारांच्या अडचणी वाढतील. त्यांनी ओमान आणि कतारमधील भारतीय राजदूतांसोबत बैठक घेण्याचे आव्हान केले.नमक्कल हे एक अंड्याचे नियातदार आहेत. त्याच बरोबर लाइवस्टॉक अँन्ड एग्री-फार्मर्स ट्रेड एसोसिएशन (LIFT)चे जनरल सेक्रेटरी पीव्ही सेंथिलने म्हटले आहे की, ओमानने घातलेल्या बंदीमुळे कमीत कमी १५ कोटी रुपयांची भारतीय अंड्यांची पहिली खेप अडकून पडली आहे. ओमानच्या इम्पोर्टर सोहर बंदरावर भारतातून पाठवण्यात आलेली अंड्यांचे कंटेनर अद्याप तसेच आहेत. नमक्कलने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे दोन प्रमुख आयत देश असलेल्या ओमान आणि कतार या देशांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारताच्या अंडी निर्यातीच्या कारभारावर मोठी घसरण झाली आहे. भारताच्या अंडी निर्यात करणारी नमक्कल जून महिन्यापासून अनेक अडचणींना तोड देत आहेत. जून महिन्यात सर्व प्रथम ओमानने आयात परवाना देण्यास बंदी घातली होती.