नेव्हीच्या स्पीडबोटने धडक दिल्यामुळे घडली दुर्घटना; 3 मृत, 66 जणांना वाचवले, 7-8 जण बेपत्ता
मुंबई-मुंबईत छोटी बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत काही प्रवासी बुडाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाच्या अरबी समुद्रात एलिफंटा लेण्यांकडे जाताना ही बोट उलटली. घटना घडताच आसपासच्या बोटी बचावासाठी छोट्या बोटीजवळ दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
संबंधित घटनेच्या प्राप्त माहितीनुसार एलिफंटा लेणी येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलिस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यावेळी हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनाऱ्यापासून सुमारे 50 मीटर समुद्रात गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. योगायोगाने एक मोठी बोट तिथे पोहोचली आणि बुडणाऱ्या बोटीतील काही प्रवाशांना मोठ्या बोटीवर नेण्यात आले.
बोट उलटण्याचे कारण समजू शकले नाही. काहींना तात्काळ वाचवण्यात आले आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना गेट वे ऑफ इंडियाजवळ आणले जात आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. जवळपास सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची शक्यता आहे.
अपघातग्रस्त बोट 80 प्रवाशांना घेऊन एलिफंटा लेणीकडे जात होती. पण रस्त्यात नेव्हीच्या स्पीडबोटने तिला धडक दिली. यामुळे बोट समुद्रात कलंडली. या घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून, 66 जणांना वाचवण्यात आले आहे. उर्वरित लोकांना नेव्ही व तटरक्षक दलाच्या मदतीने वाचवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप 7-8 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.