पुणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्यालाही दिशादर्शक ठरेल असा निर्माण करा- प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील

Date:

पुणे, दि. १८ : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

श्री. घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन श्री. घोरपडे यांनी केले.

या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...