पुणे, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२५ मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या mpsc.gov.in व mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव र.प्र. ओतारी यांनी कळविली आहे.
शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आयोगाच्या व विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवून याबाबत दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.