पुणे-कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरण याेजनेंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृहात कैद्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फुल हाईट टर्नस्टील गेट (बायाेमेट्रिक अॅक्सेस सिस्टीम), पॅनिक अर्लाम सिस्टीम व पब्लीक अॅड्रेसिंग सिस्टीम प्रणाली हरियाणातील गुरगाव येथील कंपनी इनव्हेडर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. यांचे मार्फत बसविण्यात आली आहे. सदर प्रणालीचे उदघाटन राज्य कारागृह विभागाचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांचे हस्ते करण्यात आले.
सदर प्रणाली कारागृहाचे अपर पाेलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आली. सदर उदघाटनाप्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, इनव्हेंडर टेक्नाॅलाॅजी कंपनीचे संचालक शशांक मिश्रा, अति.अधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक डाॅ.बी.एन.ढाेले, आर.ई,गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.एस.कांदे उपस्थित हाेते.
फुल हाईट टर्नस्टील गेट (बायाेमेट्रिक अॅक्सेस सिस्टीम) माध्यमातून बंदी, कर्मचारी व अभ्यागंताच्या हालचालीचे नियमन करता येणार आहे. त्यात केवळ अधिकृत व्यक्तींनाच कारागृहात प्रवेश करु शकतात. कैद्यांच्या मुक्त हालचाली प्रतिबंधीत हाेतील व बंदी पलायन करण्याच्या घटनांवर अंकुश लावता येईल. कैद्यांच्या व अभ्यांगतांच्या हालचालीचा मागाेवा घेता येणार आहे. कारागृह भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांचे याेग्य स्क्रीनिंग हाेईल. व्यस्त काळात व्यवस्थित हालचाल सुलभ हाेईल. उदा. राेल काॅल, देखरेखीसाठी बायाेमेट्रिक्स आणि कॅमेरे यासारख्या इतर सुरक्षा प्रणाली साेबत काम करता येईल.
पॅनिक अर्लाम सिस्टीम द्वारे आप्तकालीन परिस्थितीला जलद प्रतिसाद देण्याकरिता अधिकारी, कर्मचारी आणि बंद्यांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणाचा वापर केला जाईल. धाेक्याच्या बाबतीत त्वरीत मदतीसाठी अर्लट करता येऊ शकेल. दंगल किंवा हिंसाचाराच्या वेळी अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क करण्यासाठी पॅनिक बटणचा वापर हाेईल. वैद्यकीय मदतीसाठी त्वीत सूचना पाठविण्याची सुविधा कैद्यांना उपलब्ध हाेईल. बंदी पलायनाचा प्रयत्न व इतर अनुचित प्रकार वेळेत राेखता येतील. विशेषतः सायलेंट अर्लाममुळे अधिकाऱ्यांना गुप्त सूचना मिळतील. पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीमद्वारे प्रभावी संवाद, सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी उपयाेगी आहे. अधिकाऱ्यांना घाेषणा करण्यास आणीबाणी सूचना जारी करण्यास व कैद्यांचे वर्तन व्यवस्थापनासाठी उपयाेगी ठरणार आहे.