बंगळुरू, 16 डिसेंबर २०२४: भारतातील BFSI क्षेत्रासाठी आघाडीची अध्ययन सुविधा पुरवणारी संस्था मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI (MABFSI) ने ॲक्सिस बँकसोबत भागीदारी करत ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या खास महिलांसाठीच्या कोहोर्टची म्हणजेच संघटन सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या या कोहोर्टचे उद्घाटन बंगळुरू येथील MABFSI कॅम्पसमध्ये ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपती यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाने बँकेच्या विविधता आणि सर्वसमावेशक कार्यशक्तीला चालना देण्याच्या बांधिलकीला बळ दिले आहे.
ॲक्सिस बँक आणि मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI यांच्यातील सहकार्याच्यायंग बँकर्स प्रोग्रामने गेल्या 12 वर्षांत 16,000 पेक्षा अधिक पदवीधरांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे. महिलांसाठीचे हे नवे, विशेष संघटन सुरू झाल्यामुळे महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या वर्षीच्या कोहोर्टच्या तुलनेत आर्थिक वर्ष २४-२५ साठी महिलांची संख्या 700 पर्यंत वाढली असून लिंग गुणोत्तर 31% वरून 38% पर्यंत सुधारले आहे. कोहोर्ट्सच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी MABFSI आणि ॲक्सिस बँक सातत्याने मूल्यमापन आणि विशिष्ट मूल्यांकन पद्धती राबवतात. याशिवाय पदवीधरांना कार्यशक्तीमध्ये सहजपणे सामावून घेता येईल हे सुनिश्चित करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संवेदनशीलता, तणावव्यवस्थापन आणि करिअर विकासावरील कार्यशाळांद्वारे शिकण्याच्या अनुभवाला अधिक सुलभ केले जाते.मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI चे बिझनेस विभागाचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अँड हेड आताश शाह म्हणाले,“बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुण महिलांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी ॲक्सिस बँकेसोबतची आमची भागीदारी सुरू ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम पदवीधरांना केवळ तयारच करत नाही, तर त्यांना बँकिंग करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सक्षम करतो.”
ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपतीम्हणाल्या, “ॲक्सिस बँकेत, आम्ही महिलांना कार्यशक्तीमध्ये टिकून राहण्यास आणि बहुआयामी बँकर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यास वचनबद्ध आहोत. ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या वैविध्यपूर्णतुकडीमध्ये 24% विवाहित महिला आणि 44% महिला वयाच्या 25 पेक्षा जास्त वयाच्या आहेत. आमच्या कामकाजात नवा दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आणलेल्या अनेक तरुण महिलांना गेल्या काही वर्षांत आम्ही यशस्वीपणे समाविष्ट केले आहे आहे. पुढेवाटचालकरताना आम्ही व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, मेंटॉरशिप संधी आणि सहायक कामकाजाच्या वातावरणाद्वारे प्रतिभेत गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी बांधील आहोत.”
ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम हा एक व्यापक एक वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये बंगळुरू मधील MABFSI कॅम्पसवर बँकिंगच्या मूलतत्त्वांवरील चार महिन्यांचे क्लासरूम प्रशिक्षण, भारतातील ॲक्सिस बँक शाखांमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप आणि पाच महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांना मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) कडून बँकिंग सेवा क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पदव्युत्तर पदविका)प्रदान केला जातो. त्यामुळे त्यांना उद्योगाशी संबंधित ज्ञान व कौशल्य मिळते. ॲक्सिस बँक MABFSI सोबतच्या सहकार्याने आगामी बॅचेसमध्ये 50% विविधता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.