बेंगलोर – उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात अभिमानास्पद टप्प्याचा सन्मान करून साजरा करत आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक सफारीचा सन्मान टायटन वॉचेस आपल्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त करत आहे. १९८४ साली सोविएत अंतराळयान सोयूझ टी-११ मधून अंतराळात झेप घेऊन श्री शर्मा यांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले, अंतराळातून भारत कसा दिसतो आहे याचे उत्तर देताना त्यांनी उच्चारलेले “सारे जहाँ से अच्छा” हे शब्द म्हणजे जणू देशाच्या शिरपेचावरील मानाचा तुरा आहेत. त्यांचे हे एक उत्तर कोट्यावधी देशवासियांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले, या एका वाक्याने अवघ्या जगाला एकजूट भारताचे दर्शन घडवले. ४० वर्षांनंतर स्वतःचा कारीगरी आणि नाविन्याचा वारसा साजरा करत असताना, टायटन ब्रँडने लॉन्च केले आहे ‘युनिटी वॉच’, सेलेस्टीयलपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा लिमिटेड-एडिशन मास्टरपीस भारताची ही अतुलनीय गाथा सन्मानपूर्वक आपल्यासमोर मांडतो. एकता आणि अमर्याद संधी – अंतराळामधून पृथ्वीकडे पाहताना श्री शर्मा यांच्या मनात उमटलेल्या या भावनांपासून प्रेरणा घेऊन टायटनने ‘युनिटी वॉच’ तयार केले आहे. मानवतेची स्वप्ने आणि एकतेने गुंफलेले भविष्य यांनी एकत्र आलेल्या जगाचे व्हिजन या नावामधून दर्शवण्यात आले आहे.

लिमिटेड एडिशन युनिट वॉचचे फक्त ३०० पीस बनवण्यात आले आहेत. लुपा, बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या, एका विशेष हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये टायटनने या कलेक्शनमधील पहिले युनिटी वॉच विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिले. यावेळी श्री शर्मा यांनी अंतराळवारीच्या थरारक आठवणी सांगितल्या, अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या विहंगम रूपाचे पुन्हा वर्णन केले. सीमांच्या पलीकडे जाऊन ‘वसुधैव कुटुम्बकम’ या विचाराची आठवण करून देणारा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना प्रेरित करणारा ठरला. टायटनच्या डिझाईन टीमने हे विशेष घड्याळ तयार करण्यामागची नाजूक, तपशीलवार प्रक्रिया समजावून सांगितली. अंतराळ यात्रा आणि घड्याळ बनवण्याची प्रक्रिया या दोन्हींमध्ये अचूकता व अभियांत्रिकी ज्ञान, कौशल्ये अत्यंत गरजेची असतात. या सर्व चर्चांनी अवघे वातावरण प्रेरणादायी बनले, सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. टायटनचे वॉचमेकिंग आणि अंतराळ संशोधनात भारताने केलेली अचाट प्रगती या दोन्हींमधून “मेक इन इंडिया” अधोरेखित झाल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.
टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीएसएमओ श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, “गेली चार दशके टायटनने तयार केलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये “भारत” अंतर्भूत आहे. यावर्षी आम्ही विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत, एकजूट भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा दर्शवणारी ही घटना देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आमच्या इन-हाऊस टीमने तयार केलेले युनिटी वॉच नावीन्य आणि ‘मेक इन इंडिया’ ची कलात्मकता दर्शवते. हे घड्याळ अंतराळ, विज्ञान यांचा सन्मान करते, समृद्ध भारतीय परंपरा दर्शवणारी घड्याळे तयार करण्यात उचललेले पुढचे पाऊल म्हणजे हे घड्याळ आहे. हे कलेक्शन लॉन्च करून आम्ही भारताच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षा दर्शवणारी घड्याळे तयार करण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.”
विंग कमांडर राकेश शर्मा म्हणाले, “अंतराळातून जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा काळाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा वरून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा मला कोणत्याच सीमा दिसून आल्या नाहीत, दिसली ती एक सुंदर, एकजूट पृथ्वी. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या सुंदर घराचे संरक्षण करण्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाला प्राधान्य देणारे सामाजिक मॉडेल कालबाह्य झाले आहे, ते बाजूला सारण्याची वेळ आली आहे. युनिट वॉचेसमध्ये टायटनने हा विचार इतक्या चपखलपणे आणि कुशलतेने मांडला हे पाहून मला खूप आनंद झाला. याच्या सेलेस्टीयल डायलमध्ये मला आपला प्रिय भारत दिसतो, घड्याळावरील कोरीवकाम आठवण करून देते की, आपण वेळ सेकंदांमध्ये मोजतो पण प्रगतीचे मोजमाप हे आपल्याला लाभलेल्या शांततेतून केले पाहिजे. हे घड्याळ अंतराळातील प्रवासाची आठवण करून देते, इतकेच नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये असलेली, ताऱ्यांना कवेत घेण्याची क्षमता देखील दाखवून देते.”
युनिटी वॉचमध्ये टायटनने कलात्मकता आणि नावीन्य यांची नवी व्याख्या रचली आहे, पहिले कन्सील्ड ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे अतुलनीय शान आणि क्रांतिकारी डिझाईनचा मास्टरपीस आहे. आकर्षक मिडनाईट ब्ल्यू रंगाची डायल अतिशय बारकाईने चित्रित करण्यात आलेला भारत दर्शवते, विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतराळातून दिसलेल्या भारताचे विहंगम दृश्य इथे पाहायला मिळते. देशभक्तीचे तीन रंग केशरी, सफेद आणि हिरवा काट्यांवर ठळकपणे दिसतात. सेकंद काट्याचा आकार रॉकेटसारखा आहे, श्री शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीचे आणि निग्रही शोधाचे हे प्रतीक आहे. या सगळ्याचा मानबिंदू आहे श्री शर्मा यांचे ऐतिहासिक वाक्य “सारे जहाँ से अच्छा” या घड्याळाच्या मागे कोरण्यात आले आहे. त्यासोबतच ती ऐतिहासिक तारीख देखील नमूद करून भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा व यश यांचा सन्मान करण्यात आला आहे.
निवडक टायटन स्टोर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदीसाठी हे घड्याळ उपलब्ध असल्याची घोषणा करून टायटनने देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण कायम आपल्यासोबत ठेवण्याची संधी घड्याळप्रेमींना दिली आहे.

