मएसो सीनियर कॉलेज, पुणे आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे: मएसो सीनियर कॉलेजमध्ये क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या सहकार्याने रिंगोस्टिक आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन सुदाम शेळके आणि शंतनु लामधाडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय भालेराव होते. यावेळी मंचावर क्रीडा भारतीचे शैलेश आपटे, केशव राज चौधरी, विजय पुरंदरे, शकुंतला खटावकर आणि मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, पंच आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत १५ महाविद्यालयांमधून एकूण ६० संघांनी भाग घेतला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अभिजीत गर्ग यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/12/101-1024x571.jpeg)
मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी विजय पुरंदरे, विजय रजपूत, जयसिंग जगताप उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
रिंगोस्टिक मुली
- प्रथम क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
- द्वितीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची सैनिकी शाळा
- तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप ज्युनियर कॉलेज, पुणे
रिंगोस्टिक मुले
- प्रथम क्रमांक – मएसो वाघिरे कॉलेज, पुणे
- द्वितीय क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
- तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे
रस्सीखेच मुली
- प्रथम क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ ब), पुणे
- द्वितीय क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ अ), पुणे
- तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची शाळा, पुणे
रस्सीखेच मुले
- प्रथम क्रमांक – आबासाहेब गरवारे कॉलेज (संघ ब), पुणे
- द्वितीय क्रमांक – मामासाहेब मोहोळ कॉलेज, पौड रोड, पुणे
- तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे
प्रा. नेहा कुलकर्णी आणि रवींद्र गोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्या डॉ. पूनम रावत यांनी आभार मानले.