पुणे:पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या E&TCE विभागाने क्रिस्टल इंडिया LLP, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत iDosT नावाचा वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प विकसित केला जात आहे. हा प्रकल्प डॉ. शिव वर्मा यांच्या अमेरिकन पेटंटवर आधारित असून वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल घडविण्याची क्षमता आहे.
नुकतीच, प्रकल्पाचे प्रणेते डॉ. शिव वर्मा,करुणाकर नामपल्ली
यांनी PICT महाविद्यालयाला भेट देत iDosT प्रकल्पाची प्रगती पाहिली. डॉ. वर्मा हे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील PhD पदवीधारक असून, दूरसंचार व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नावावर 12 पेक्षा जास्त अमेरिकन पेटंट्स असून ते भारत आणि अमेरिकेतील स्टार्टअप कंपन्यांशी संबंधित आहेत.
या प्रकल्पासाठी डॉ. संदीप गायकवाड, प्रा. ललित पाटील, आणि प्रा. सुनील खोत यांचा सक्रिय सहभाग असून, प्रा. एम. व्ही. मुनोत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेतली असून Robotics Club च्या विद्यार्थ्यांनीही आपले योगदान दिले आहे.
पीआयसीटीचे प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे आणि संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ दिले आहे. iDosT प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.