Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“मेरी रातें, मेरी सड़कें!”महिला हिंसाचाराच्या विरोधात ‘जागर मोर्चा’ला उत्सफूर्त प्रतिसाद

Date:

पुणे: “हम भारत कि नारी है, फुल नही चिंगारी है”, “महिला शक्ती आयी है,  नई रोशनी लायी है” असे म्हणत हातात घुंगराच्या काठ्या घेऊन महिला हिंसाचाराच्या विरोधात घोषणा देत, महिला सक्षमीकरणाची गाणी गात, पुण्यातील महिला-मुली शनिवारी रस्त्यावर उतरल्या. कित्येक वर्षापूर्वी १६ डिसेंबरला दिल्लीतील निर्भया प्रकरण झाले . त्यानिमित्ताने शहरातील महिला जागर समितीच्या वतीने या ‘जागर मोर्चा’चे आयोजन करण्यात आले  होते.

रविवारी संध्याकाळी महात्मा फुले वाड्यातील समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख उपस्थिती आमदार नितीन राऊत यांची होती. महिला जागर समितीला त्यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या व सतत त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची हमी दिली. मासे अळी–फडगेट पोलीस चौकी–चिंचेची तालीम–बाजीराव रोड–शनिपार चौक–अप्पा बळवंत चौक–शनिवार वाड्याजवळून हा मोर्चा लाल महालात पोहचला. या दरम्यान रस्त्यात महिला सक्षमीकरणावर, महिला हिंसाचाराच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या, गाणी, कविता सादर केल्या. त्यानंतर लाल महालातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करून या मोर्चाची सांगता करण्यात आली.
तसेच देशातील ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली व हिंसेच्या विरोधात आम्ही उभे राहू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. मेणबत्त्या लावून त्या ज्योतीच्या प्रकाशाने अंधारावर मात करत, आम्ही एक दिवस नक्की एक न्यायपूर्ण आणि निर्भय समाज बनवण्याचा प्रयत्न करू, या निर्धाराने ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाऊन जागर मोर्चाची सांगता झाली.

याप्रसंगी बोलताना महिलांसाठी स्त्री-पुरुष समानतेची व्यवस्था निर्माण करून विकासाची समान संधी निर्माण करणे, त्याचबरोबर समान प्रतिष्ठा, दर्जा, निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे यांनी व्यक्त केले.  महिलांवर होणारे अत्याचार संपवायचे असतील तर मुलींवर बंधन आणण्यापेक्षा आपल्या घरातील मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवायला पाहिजे, असे प्रतिपादन अभिव्यक्ती संघटनेच्या समन्वयक अलका जोशी यांनी व्यक्त केले. तर महिलांनी स्वतःच स्वतःसाठी उभं राहिल पाहिजे, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविषयी स्वतःच आवाज उठवला पाहिजे, असे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकील असुंता पारधे (चेतना महिला विकास संस्था) यांनी व्यक्त केले. स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे. असे कार्यक्रम महिलांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळवून देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मृणालिनी वाणी म्हणाल्या. आजही स्त्री आर्थिकदृष्ट्या उदासीन, शिक्षणात दुर्लक्षित, कुटुंबात दुय्यम, समाजात उपभोगाची वस्तू बनलेली आहे. देश एकविसाव्या शतकाच्या भौतिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असला, तरी स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, ही खंत रंजना पासलकर यांनी व्यक्त केली.  महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळते, तेथे तेथे त्या आपल्या संधीचे सोने करत असतात, त्यामुळे महिलांचा प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे मत प्रियंका रणपिसे (ओजस्वी बहुउद्देशीय संस्था) यानी व्यक्त केले. शाळामधून गुड टच-बॅड टच सारखे उपक्रम तर व्हायला पाहिजेत पण घरकामात वडिलांनी जर हातभार लावला तर आपसूकच लहानपणापासून मुल संवेदनशील पध्द्तीने विचार करायला लागतात, असे मत शारदा नितनवरे (कौरंग फाउंडेशन) यांनी मांडले. याप्रसंगी गुलाबो गँगच्या संगीत तिवारी, नीता रजपूत, वारसा सोशल फाउंडेशनच्या प्राची दुधाने मिळून साऱ्याजणीच्या स्मिता शेट्टी, संगीत पटणे आदी उपस्थित होत्या. यावेळी ‘ओय नजर संभाल’, ‘महिलांवरील हिंसाचार आता बस’ असा सामाजिक संदेश देणारे टि-शर्टही बनविण्यात आले होते.

‘महिला जागर समिती’च्यावतीने सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘हे रस्ते रात्रीच्या वेळी जसे पुरूषांचे आहेत, तसेच आमचे (महिलांचे) आहेत’, हे सांगण्यासाठी ‘मेरी रातें, मेरी सड़कें’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध फुटपाथवर महिलांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेतले. महिला हिंसाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या महिला जागर समितीमध्ये राज्यभरातील 50 हून अधिक संस्था, संघटना सहभागी आहेत.

सहभागी संस्था-संघटना: अभिव्यक्ती, वारसा सोशल फाउंडेशन, हम भारत के लोग, गुलाबो गॅंग, ओजस्वी बहुउद्देशीय संस्था, चेतना महिला विकास संस्था, सगुणा महिला संघटना, संयुक्त स्त्री संस्था, वाचनसाधना ग्रंथालय, अक्षरा केंद्र (मुंबई), पेहेल फाउंडेशन, मिळून सार्‍याजणी, ज्ञानभारती प्रतिष्ठान, रुक्माई भजनी मंडळ, महाराष्ट्र महिला विकास मंच, कौरंग फाउंडेशन, राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडी (RMS), स्व. श्री. सुरेंद्र आनंद मेमोरियल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य भूमाता संघटना, मनस्विनी मंच (वर्धा), महाराष्ट्र महिला परिषद, बोधिसत्व बहुउद्देशीय विकास सोसायटी (बडनेरा), संघर्ष बहुउद्देशीय संस्था (अमरावती), क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन (अमरावती), स्त्री आधार महिला संस्था (मुंबई), युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (लातूर), आम्ही भारतीय महिला मंच (कोल्हापूर), मनस्विनी महिला विकास सेवाभावी संस्था (अंबाजोगाई), सत्यशोधक महिला आघाडी (नांदेड), स्त्री सोशल फाऊंडेशन, विचारधन, संगम वर्ल्ड सेंटर, सीवायडीए, ग्रीन तारा फाऊंडेशन, महिला कल्याण केंद्र, शांताई संस्था, इंडिया स्पॅान्सरशिप कमिटी, निर्भय युवा प्रतिष्ठान, संकल्प सखी, भटके विमुक्त संघटना, परिवर्तन, निर्भय विद्यार्थी अभियान, एकजुट महीला संस्था (खराडी), वात्सल्य सुरक्षा ऑर्गनायझेशन (केशवनगर), सहेली ग्रामीण बहुउद्देशीय महिला संस्था (नाशिक), विद्यादान व सामाजिक सेवा भाव ट्रस्ट (मुंबई) या संस्थांचा समावेश आहे.

अजूनही रस्ते, गल्ली, कॉलेज, बस, बाजार, घर, कामाचे  ठिकाणी अथवा खेळाच्या मैदान हे महिलांसाठी असुरक्षित आहेत आकडेवारीनुसार देशात आज दर 16 मिनिटाला एक बलात्कार होत आहे. परंतु, ही फक्त नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. दिवसेंदिवस वाढते हिंसाचार पाहून मन सुन्न होतं. या वर्षी निर्भया घटनेला 12 वर्ष पुर्ण होत आहे व बदलापूर घटनेला 1 महिना पुर्ण होत आहे यामुळे महिला हिंसाचाराच्या विरोधात व महिलांना समाजामध्ये सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे म्हणून 21 सप्टेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत, 12 रात्री महिलांनी निर्भयपणे रस्त्यावर येऊन जगण्यासाठी व स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी  पुण्यामधील ‘महिला जागर समिती’ मार्फत ‘मेरी रातें, मेरी सड़कें!’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असं जीविका उथडा यांनी सांगितले.
या अंतर्गत पहिला कार्यक्रम हा 21 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत सावित्रीबाई फुले पुतळासमोरील फुटपाथ, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आलेला आहे. हे रस्ते जेवढे तुमचे आहेत तेवढेच आमचेही आहेत हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर सात रात्री उतरलो! त्यात एकमेकींशी मनातलं बोललो, परखडपणे मते मांडली, मुक्तपणे नाचलो-गायलो, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागी स्त्रियांचा इतिहास सांगितला, चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मान केला त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली. यातून नक्कीच आधीपेक्षा बिनधास्त झाल्या, स्वतःसाठी काही क्षण जगल्या, तसा हा संघर्ष चालूच राहणार! तर 16 डिसेंबर 2024 च्या 12व्या रात्री महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात महिला जागर मोर्चा काढून या कार्यक्रमाचा समारोप होईल.  
हिसेंच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, स्वतःचे आणि इतर सख्यांचे भय घालवण्यासाठी, रस्त्यावर निर्भयपणे चालण्यासाठी, एकमेकींची सुख-दु:खे समजून घेण्यासाठी, एक निर्भय मनमोकळा श्वास घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला शोधण्यासाठी मुलीनीं व महिलांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन प्राची दुधाने यांनी केले. तर नीता रजपूत यांनी या अभियानात पुण्यातील विविध बचतगट, विविध शिक्षण संस्थामधील कॉलेज मधील विद्यार्थिनी व कमर्चारी तसेच सोसायटी मधील महिलांना सहभागी करून घेण्याबाबतची माहिती दिली.
या सर्व अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देताना नीलिमा राऊत यांनी संगितले कि यात गाणी, नृत्य, चर्चा अशा सर्जनशील पद्धतींचा समावेश असेल. तसेच मुख्य सहभाग हा मुली, महिला आणि त्यांची लहान मुलं यांचा असेल तर यात पुरुषांचे सहकार्य ही स्वागतार्ह असेल.  
या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता. या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता: गुड्डी: 77380 82170  श्रद्धा: 92704 78335

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...