गुजरातच्या टीम-२ संघाला स्पर्धेचे ‘टिम चॅम्पियनशीप’ !!
राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद, आसिफ अलि सय्यद यांचा गट-विजेतेपद !!
पुणे, १६ डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली होणार्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेत गुजरातच्या टीम-२ संघाने राष्ट्रीय सांघिक विजेतेपद संपादन केले. राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद आणि आसिफ अलि सय्यद यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले.
पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे झालेल्या निर्णायक फेरीमध्ये साडेपाच किलोमीटरच्या धावपट्टीमध्ये रॅली-रेसर्सच्या दोन शर्यती घेण्यात आल्या. या दोन्ही शर्यतीं मिळून सरासरीतील सर्वोत्तम वेळची नोंद करण्यात आली. ओपन अपटू ५०० सीसी ग्रुप सी१ क्लास मध्ये राजेंद्र आरई याने पहिला क्रमांक मिळवला. क्लास सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट) मध्ये सिनान फ्रान्सीस याने सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद यांनी आपापल्या गटामध्ये सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. महिला गटामध्ये रेहान बी. हिने, प्रौढ गटामध्ये एम.डी. सईद आणि स् कूटर २१० सीसी क्लास मध्ये आसिफ अलि यांनी विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘युरोग्रीप’ टायर उत्पादक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक फराझ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना उपस्थित होते. सर्व विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
या फेरीमध्ये देशातील ७० रायडर्सनी सहभाग घेतला होता. चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकालः (प्रथम, दुसरा, तिसरा क्रमांक; नोंदवलेली वेळ या क्रमानुसार)ः
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसीः राजेंद्र आर.ई. (१२.४०.७०० मि.); नटराज आर. (१२.५०.३०० मि.); नरेश व्हि.एस. (१३.०६.५०० मि.);
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट)ः सिनान फ्रान्सीस (१२.३१.४०० मि.); नटराज आर. (१२.५८.१०० मि.); नरेश व्हि.एस. (१२.५९.७०० मि.);
ग्रुप बीः सी३-१३१ सीसी अपटू १६५ सीसीः वरूण कुमार (१३.४५.६०० मि.); स्टिफन रॉय (१३.४६.२००); भरथ एल. (१४.१४.४०० मि.);
ग्रुप बीः सी४-१६६ सीसी अपटू २६० सीसीः डी. सचिन (१२.५८.१०० मि.); संजय सोमशेखर (१२.५८.६००); करण कुमार (१३.१३.६०० मि.);
ग्रुप बीः सी५-२६१ सीसी अपटू ४०० सीसीः हेमंत गोड्डा (१३.२५.००० मि.); रोहीत शिंदे (१३.२८.५०० मि.); राजेश स्वामी (१३.३९.१०० मि.);
ग्रुप बीः सी६-बुलेट- सीएल अपटू ५५० सीसीः सुहेल अहमद (१३.१८.७०० मि.), सिनान फ्रान्सीस (१३.२५.००० मि.); सुहास एस.एस. (१४.१३.५०० मि.);
ग्रुप बीः सी७-स्कूटर- अपटू २१० सीसीः आसिफ अलि सय्यद (१३.४५.२०० मि.); शमिम खान (१४.२९.८०० मि.); एन. कार्थिक (१४.५५.१०० मि.);
ग्रुप बीः सी८-महिला- अपटू २६० सीसीः रेहान बी. (१५.४३.४०० मि.); स्नेहा सी.सी. (१७.२९.८०० मि.); तनया सिंग (१७.४०.६०० मि.);
ग्रुप बीः सी९-प्रौढ गट (५० वर्षावरील) अपटू २६० सीसीः एम.डी. सईद (१४.३८.१०० मि.); ए.जे. जोस (१५.०७.८०० मि.); अमरेंद्र साठे (१५.१३.५०० मि.);
ग्रुप डीः सी१०- अपटू २६० सीसीः संजय सोमशेखर (१३.३६.८०० मि.); योगेश पी. (१४.०८.६०० मि.); नावेद खान (१४.३१.८०० मि.);