मुंबई- कोथरूड चे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील,पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ तसेच नीतेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे,शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, जयकुमार रावलमेघना बोर्डीकर, यांना भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आले आहे.
नागपूर विमानतळावर उतरताच शिवेंद्रराजेंना देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राजे शपथ घ्यायला या असे म्हटले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 1998 – 99 सालात महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर 26 वर्षांनी सातारा तालुक्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे.
(आज सकाळी पावणेदहा वाजे पर्यंत )

