पुणे: पुण्यातून पुन्हा कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून आजच त्यांचा शपथविधी होणार आहे.त्यांना कोणते खाते देण्यात येणार आणि पुण्याचे पालक मंत्री पद त्यांच्याकडे ठेवणार काय ? याबाबतच आता उत्सुकता राहिली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांचा परिचय..
वैयक्तिक
जन्म १० जून १९५९; प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई,
आई-वडील दोघेही मिल कामगार,
राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई येथे शालेय शिक्षण
सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट, मुंबई येथे बी. कॉम. पदवी शिक्षण.
पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, बी. कॉम., आयसीडब्ल्यूए (कॉस्ट ऑडिटर)
- एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी
-ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पुणे जिल्हा पालकमंत्री; ४ ऑक्टोबर २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
१) मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.
२) नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी.
वस्त्रोद्योग मंत्री म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.
राज्याचे कॅबिनेट मंत्री
२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी.
विधिमंडळ कार्य
जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ आणि २०२४ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. ऑगस्ट २०२२ पासून संसदीय कार्य मंत्री म्हणून प्रभावी कार्य.
भारतीय जनता पार्टी, प्रदेशाध्यक्ष दि. १६ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत
- प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रभावी कार्य
संघ परिवार
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता. महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर काम केले. १९८० ते १९९४ ऐन तारुण्यात संघटनेसाठी पूर्णवेळ संपूर्ण समर्पणाने काम. त्यानंतर १९९५- १९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून तर सन १९९९-२००४ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात योगदान.
सामाजिक बांधलकी
कोथरूड मध्ये समुत्कर्ष सोशल फाउंडेशन, मानसी उपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नववधूंना झाल, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल मुलींचे पालकत्व, मोफत ई सेवा केंद्र, कोवीड काळातील सेवा कार्य, दिवाळी फराळ, एकांकिका स्पर्धा, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून कोथरुड मधील प्रत्येक घटकाशी संपर्क स्थापन करण्यात यश.

