पुणे: जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मे. गॅब्रिएल इंडिया लि. चाकण येथे आयोजित ‘महाराष्ट्र एक्स्पोर्ट कन्वेन्शन 2024-25’ ही निर्यातदारांची एक दिवशीय कार्यशाळा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी कार्यशाळेत उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, सह विकास आयुक्त मित्तल हिरेमठ, भारतीय डाक विभागाचे संदीप बटवाल, भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाचे (एफआयईओ) ऋषि मिश्रा, अपेडाच्या सुनिता सावंत, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (ईईपीसी) प्रतापसिंग भद्रा, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. मापारी यांनी उद्योगांना जागा व इतर सोईसवलतीबाबत घटकांना मार्गदर्शन केले. श्री. रजपूत यांनी महाराष्ट्र शासनाची निर्यात धोरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन विविध टप्यावर मदत करण्याचे आवश्वासन दिले. श्रीमती हिरेमठ यांनी विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) मधील उद्योगांच्या सोयी सुविधा व योजनाबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती पुष्पा गंगावणे यांनी निर्यातीभिमूख उद्योगांच्या सोईसवलतीव कार्यपद्धतीबाबत तर श्री. बटवाल यांनी डाक विभागामार्फत निर्यातीच्या सेवाबाबत माहिती दिली.
एफआयईओचे श्री. ऋषि मिश्रा यांनी निर्यातीच्या अनुषंगाने, श्रीमती सुनिता सावंत तसेच श्री. भद्रा यांनी कृषी निर्यात सवलती व सोयीसुविधांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना अद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकरी संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादन, केंद्र, बँका आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.