पुणे, १२ डिसें.२४ : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, दिल्ली, आणि शिव नाडर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.१३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत चीनच्या औद्योगिक क्रांतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अंतर्संबंध: भारत आणि जगासाठी आव्हाने या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संत ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्याहस्ते होईल.अध्यक्षस्थानी एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
या परिषदेत लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल भूषण गोखले, प्रा. जी. व्यंकट रमण आणि ब्रिगेडियर अंशुमन नारंग यांच्यासह अनेक नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत.
औद्योगिक वृद्धीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर अर्थपूर्ण संवाद साधणे व भारतासाठी उदयोन्मुख भौगोलिक – राजकीय आणि आर्थिक वास्तवात संचालन करण्याचे मार्ग अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. परिमल माया सुधाकर यांनी दिली.