पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित ‘मोदी 3.0’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उलगडून सांगणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम रविवार, दि. 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे आणि सचिव अमृता कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळात कार्यरत असताना प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधानांचे व्यक्तीमत्त्व व कार्यपद्धती अनुभवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर बोलणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.